शाओमीचा सर्वात नवीन आणि अॅडव्हान्स युजर इंटरफेस MIUI 14 लाँच करण्यात आला आहे. अलीकडेच Xiaomi, Mi आणि Redmi फोन्सचा MIUI 14 Rollout Plan जारी करण्यात आला होता. आता पोको इंडियानं देखील आपल्या फोन्ससाठी मीयुआय 14 रोल-आउट शेड्यूल शेयर केलं आहे. कंपनीनं 10 स्मार्टफोन्सची लिस्ट जारी करून सांगितलं आहे की कोणत्या POCO Phone ला कधी MIUI 14 मिळेल. ही संपूर्ण लिस्ट तुम्ही पुढे पाहू शकता.
हे पोको फोन होतील MIUI 14 वर अपडेट:-
POCO X Series
POCO X5 Pro 5G
POCO X3 Pro
POCO X4 Pro 5G
POCO F Series
POCO F4 5G
POCO F3 GT
POCO M Series
POCO M5
POCO M4 5G
POCO M4 Pro
POCO M4 Pro 5G
POCO C Series
POCO C55
POCO MIUI 14 Roll-Out Plan
इंडियन पोको फोन युजर्सना मीयुआय 14 चा अपडेट तीन फेजमध्ये मिळेल. या फेजची विभागणी 3 क्वॉर्टरनुसार करण्यात आली आहे ज्यात जानेवारीपासून मार्च, एप्रिलपासून जून आणि जुलैपासून सप्टेंबरचा समावेश आहे. पहिल्या फेजमध्ये पोको एक्स5 प्रो 5जी फोनला लेटेस्ट MIUI 14 चा अपडेट मिळेल आणि नेक्स्ट फेज पुढील महिन्यात सुरु होईल.
दुसऱ्या फेज मध्ये म्हणजे सेकंड क्वार्टर मध्ये पोको एफ4 5जी, पोको एफ3 जीटी, पोको एक्स3 प्रो, पोको एम5, पोको एम4 5जी तसेच पोको सी55 ला मीयुआय 14 अपडेट मिळेल. पोको एम4 प्रो, पोको एक्स4 प्रो 5जी तसेच पोको एम4 प्रो 5जी फोनला यंदा तिसऱ्या तिमाहीत म्हणजे थर्ड फेज अंतगर्त MIUI 14 चा अपडेट मिळेल.
मीयुआय 14 वर अपडेट होणार शाओमी फोन्स
शाओमी अधिकाऱ्यांनी सांगतील आहे की कोणत्या स्मार्टफोनला MIUI 14 वर अपडेट केलं जाईल. कंपनीनं ग्लोबल लिस्ट शेयर केली आली आहे ज्यात ‘शाओमी’ ब्रँडिंग सोबतच ‘मी’ आणि ‘रेडमी’ ब्रँड अंतगर्त येणाऱ्या मोबाइल फोन्सचा देखील या रोल-आउट प्लॅनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
