Categories: बातम्या

8 फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो Moto E13 स्मार्टफोन, किंमत देखील लीक

Highlights
  • मोटोरोला भारतात 8 फेब्रुवारीला लाँच करू शकते Moto E13 स्मार्टफोन
  • मोटोरोलाचा हा एंट्री लेव्हल फोन युरोपमध्ये लाँच झाला आहे.
  • Moto E13 भारतात दहा हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर केला जाऊ शकतो.

Motorola नं भारतात एंट्री लेव्हल स्मार्टफोन Moto E13 लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 8 फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो. टिपस्टर मुकुल शर्मानुसार मोटोरोलाचा हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन भारतात 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. मोटोरोला Moto E13 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी युरोपमध्ये मिड रेंज स्मार्टफोन Moto G23 सह लाँच झाला आहे. रिपोट्सनुसार Moto E13 फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ पॅनल, Unisoc T606 SoC, 4GB RAM आणि 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते.

Moto E13 ची किंमत आणि उपलब्धता

Moto E13 स्मार्टफोन भारतात एंट्री-लेव्हल सेग्मेंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. आशा आहे की याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. मोटोरोलाच्या या या फोनची किंमत युरोपमध्ये 120 यूरो (सुमारे 10,662 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन 4 जीबी रॅम + 64 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच होऊ शकतो. Moto E13 तीन कलर कॉस्मिक ब्लॅक, ऑरोरा ग्रीन आणि क्रीमी व्हाइट मध्ये लाँच केला जाऊ शकतो. Moto E13 भारतसह मिडिल ईस्ट, आफ्रिका, आशिया पॅसिफिक, लॅटिन अमेरिकेत देखली लाँच करू शकते. हे देखील वाचा: Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली; आता प्रीबुक केल्यास भरपूर फायदे

युरोपमधील Moto E13 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5” HD+ display
  • 13MP rear camera
  • 2GB + 64GB storage
  • Unisoc T606 processor
  • 10W 5,000mAh battery

मोटोरोला ई13 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 269पीपी आयला सपोर्ट करते. हा फोन आयपी52 रेटेड आहे ज्यामुळे पाण्याच्या शिंतोड्यांचा यावर परिणाम होत नाही. मोटो ई13 चे डायमेंशन 164.19 x 74.95 x 8.47एमएम आणि वजन 179.5ग्राम आहे.

Moto E13 अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ सह लाँच झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर Unisoc T606 प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी57 एमसी2 जीपीयू देण्यात आला आहे. या फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. मोटो ई13 ड्युअल 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह येतील Vivo V27 आणि Vivo V27 Pro; लाँच पूर्वीच मोठा खुलासा

फोटोग्राफीसाठी या मोटोरोला फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोटो ई13 एफ/2.5 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

Published by
Siddhesh Jadhav