Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली समोर

Highlights

  • Samsung Galaxy S23 सीरिज Unpacked event च्या माध्यमातून लाँच करण्यात आली आहे.
  • फोन्समध्येे डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स डिस्प्ले, अँड्रॉइड 13 ओएस, 45वॉट पर्यंत फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळतो.
  • Samsung Galaxy S23 ची किंमत भारतात 74,999 रुपयांपासून सुरु होते.

Samsung Galaxy S23 सीरिजच्या भारतीय किंमतीची अधिकृत माहिती अमेरिकन लाँच नंतर काही तासांनी देण्यात आली आहे. या सीरिजमध्ये Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra स्मार्टफोन्सचा समावेश करण्यात आला आहे जे Galaxy S22 series ची जागा घेतील. यातील Samsung Galaxy S23 Ultra सर्वात शक्तिशाली मॉडेल आहे जो 200MP प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह बाजारात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस23 सीरिज Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आणि Android 13 OS सह बाजारात आली आहे. पुढे आम्ही सॅमसंग गॅलेक्सी एस23, गॅलेक्सी एस23 प्लस आणि सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्राच्या भारतातील किंमतीची आणि ऑफर्सची माहिती दिली आहे.

Samsung Galaxy S23 Series prices in India

Samsung Galaxy S23 ची किंमत भारतात 74,999 रुपयांपासून सुरु होते, जी स्मार्टफोनच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. तर स्मार्टफोनचा 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 79,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन फँटम ब्लॅक, क्रिम, ग्रीन आणि लॅव्हेंडर कलर ऑप्शनसह उपलब्ध होईल. हे देखील वाचा: Airtel ग्राहकांना मोठा धक्का! बंद झाले कंपनीचे सर्वच स्वस्त रिचार्ज प्लॅन

Samsung Galaxy S23 Plus च्या बेस मॉडेलची किंमत 94,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात 8GB रॅमसह 256GB स्टोरेज मिळते. तर 104,999 रुपये देऊन तुम्ही या स्मार्टफोनचा 8GB रॅम व 512GB स्टोरेज मॉडेल विकत घेऊ शकता. हा फोन फँटम ब्लॅक आणि क्रीम कलरमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy S23 Ultra च्या 12GB रॅम व 256GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 124,999 ठेवण्यात आली आहे. तर 12GB रॅम व 512GB स्टोरेजसाठी 134,999 रुपये आणि 12GB रॅम व 1TB स्टोरेजसाठी 154,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन फँटम ब्लॅक, क्रीम, ग्रीन, रेड, ग्रॅफाइट, लाइम आणि स्काय ब्लू कलर ऑप्शनसह बाजारात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस23 सीरिज प्री बुकिंग आणि ऑफर्स

आज म्हणजे 2 फेब्रुवारीपासून गॅलेक्सी एस23 सीरिज भारतात प्री-बुकिंगसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध झाली आहे. Galaxy S23 Ultra ची प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Watch4 LTE classic आणि Galaxy Buds2 4,999 रुपयांच्या स्पेशल प्राइसमध्ये खरेदी करता येतील. तर Galaxy S23+ च्या प्री बुकिंगवर Galaxy Watch4 BT तुम्ही 4,999 मध्ये मिळवू शकता. Galaxy S23 प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना 5000 रुपयांची स्टोरेज अपग्रेड ऑफर मिळेल.

त्याचबरोबर ऑनलाइन चॅनेल्सवर 8000 रुपयांचा बँक कॅशबॅक देखील या स्मार्टफोन्सवर सॅमसंग देत आहे. तसेच सॅमसंग लाइव्हच्या माध्यमातून आज प्री बुकिंग केल्यास तुम्हाला वायरलेस चार्जर आणि ट्रॅव्हल अडॅप्टर मोफत मिळेल. हे देखील वाचा: कोल्ड्रिंक विकणारी कंपनी करणार स्मार्टफोन लाँच; Coca-Cola Phone बाबत मोठा खुलासा, तारीखही ठरली

सॅमसंग गॅलेक्सी एस23 आणि सॅमसंग गॅलेक्सी एस23 ची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा च्या स्पेसिफिकेशन्ससाठी इथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here