Vivo V27 आणि Vivo V27 Pro फेब्रुवारीमध्ये येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती

Highlights

  • विवो भारतात सध्या Vivo V27 आणि Vivo V27 Pro स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे.
  • Vivo V27 Pro स्मार्टफोन भारतात कर्व डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो.
  • Vivo V27 सीरीजच्या प्रीमियम फोनमध्ये फ्लॅगशिप MediaTek 8200 SOC मिळू शकते.

Vivo भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन सादर करणार आहे. यात बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी Vivo Y100 आणि Vivo Y78 चा समावेश असेल. तसेच प्रीमियम स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी Vivo X90 आणि Vivo X90 Pro येतील. तर मिड रेंज मधील ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनी लोकप्रिय Vivo V27 लाइनअप सादर करू शकते. आता Vivo V27 सीरीजच्या लाँच पूर्वी सीरिजची एक्सक्लूसिव्ह माहिती आमच्या हाती लागली आहे. Vivo हे स्मार्टफोन भारतात फेब्रुवारीमध्ये लाँच करू शकते.

Vivo V27 सीरिजची लीक माहिती

    Vivo V27 आणि Vivo V27 Pro येऊ शकतात बाजारात

  • Vivo V27 Pro मध्ये कर्व डिस्प्ले

  • MediaTek 8200 SOC

  • कलर चेंजिंग बॅक पॅनल

विवो भारतात आपल्या Vivo V27 सीरीजमध्ये Vivo V27 आणि Vivo V27 Pro असे दोन स्मार्टफोन सादर करू शकते. Vivo V27 सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन गेल्यावर्षी आलेल्या Vivo V25 आणि Vivo V25 Pro पेक्षा परफॉर्मेंस आणि कॅमेऱ्यात मोठ्या अपग्रेडसह लाँच केले जाऊ शकतात. त्यानंतर कंपनी या सीरीजचा विस्तार करत Vivo V27e भारतात सादर करू शकते. हे देखील वाचा: कोल्ड्रिंक विकणारी कंपनी करणार स्मार्टफोन लाँच; Coca-Cola Phone बाबत मोठा खुलासा, तारीखही ठरली

Vivo V27 Pro स्मार्टफोनबद्दल मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन प्रीमियम लुक ऑफर करू शकतो. कंपनी हा स्मार्टफोन कर्व डिस्प्लेसह लाँच करू शकते. विवोच्या आगामी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकच्या दमदार प्रोसेसर मिळू शकतो. Vivo V27 Pro स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप MediaTek 8200 SOC मिळू शकते, अशी माहिती मिळाली आहे. हे देखील वाचा: Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली; आता प्रीबुक केल्यास भरपूर फायदे

विवो की V-सीरीज आपल्या दमदार लुक आणि शानदार कॅमेरा क्वॉलिटीसाठी ओळखली जाते. आगामी Vivo V27 सीरीज बाबत इंडस्ट्री सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे, त्यानुसार या सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा Sony चा हाय-एन्ड सेन्सर असू शकतो. हा फोन शानदार नाइट फोटोग्राफी एक्सपीरियंस देऊ शकते, अशी चर्चा आहे. Vivo V27 सीरीजचा लुक पाहता कंपनी या सीरीजचे दोन्ही स्मार्टफोन कलर चेंजिंग बॅक पॅनलसह लाँच करू शकते. सध्या Vivo V27 बद्दल इतकीच माहिती उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here