लेनोवो अधिकृत टेक कंपनी मोटोरोला ने काही दिवसांपूर्वी आपल्या आॅफिशियल इंडियन ट्वीटर हँडल वरून सांगितले होते की कंपनी लवकरच भारतात आपली मोटो जी6 सीरीज सुरू करणार आहे. मोटोरोला ने सांगितले होते की कंपनी मोटो जी6 आणि मोटो जी6 प्ले स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात सादर करेल. आज मोटोरोला ने आपल्या आगामी स्मार्टफोन्सची लॉन्च डेट सांगितली आहे. मोटोरोला ने मीडिया इन्वाईट शेयर करत सांगितले आहे की कंपनी जून च्या 4 तारखेला दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे.
मोटोरोला इंडिया ने मीडिया इन्वाईट शेयर करत माहिती दिली आहे की कंपनी आगामी 4 जूनला भारतात एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या माध्यमातून कपंनी आपले दोन नवीन स्मार्टफोन मोटो जी6 आणि मोटो जी6 प्ले भारतात लॉन्च करेल. मोटोरोला ने सांगितले की लॉन्च नंतर मोटो जी6 स्मार्टफोन शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल तर मोटो जी6 प्ले फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव विकला जाईल. ईकॉमर्स साइट सह हे दोन्ही फोन मोटो हब वर पण सेल साठी उपलब्ध होतील.
मोटो जी6 प्ले या सीरीज चा सर्वात स्वस्त फोन आहे. हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. मोटो जी6 प्ले मध्ये 5.7—इंचाचा एचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट वर उपलब्ध आहे आणि यात 1.4गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या सोबत 3जीबी रॅम आणि 32जीबी ची मेमरी देण्यात आली आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही माइक्रोएसडी कार्ड वापरू शकता.
मोटो जी6 प्ले मध्ये फोटोग्राफी साठी 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आहे तर सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे. दोन्ही कॅमेरा सोबत तुम्हाला फ्लॅश मिळेल. मोटो जी6 प्ले मध्ये मागच्या पॅनल वर तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 4,000 एमएएच ची बॅटरी दिली आहे.
मोटोरोला च्या या दोन्ही स्मार्टफोन्स ची किंमत काय असेल तसेच कोणत्या तारखेला हे फोन सेल साठी उपलब्ध होतील, या माहितीसाठी फोन लॉन्च ची वाट बघावी लागेल.
