91मोबाईल्स ने गेल्याच आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये यूएस च्या सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर लिस्ट मोटोरोला चा आगामी स्मार्टफोन मोटो जी7 को इंटरनेट वर शेयर केला होता. या रिपोर्ट मध्ये आम्ही मोटो जी7 च्या मॉडेल नंबरच्या माहिती सोबत असे सांगितले होते की लेनोवो अधिकृत मोटोरोला ने मोटो जी7 ची निर्मिती सुरू केली आहे आणि येत्या काळात हा टेक मंचावर सादर करेल. तसेच आज पुन्हा एकदा मोटो जी7 संबंधित अजून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
91मोबाईल्स च्या टीम ने मोटो जी7 चा अजून एक नवीन मॉडेल शोधून काढला आहे. हा मॉडेल नंबर अमेरिकन फेडरल कम्यूनिकेशन्स कमिशन च्या वेबसाइट वर मिळाला आहे. मोटो जी7 चा हा नवीन वेरिएंट एक्सटी1965-3 मॉडेल नंबर वाला आहे. विशेष म्हणजे आधी जो वेरिएंट समोर आला होता त्याचा मॉडेल नंबर एक्सटी1965-2 होता. मोटो जी7 चा हा नवीन मॉडेल काही महत्वच्या स्पेसिफिकेशन्स सह अमेरिकन वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे.
मोटो जी7 च्या एक्सटी1965-3 मॉडेल मध्ये 4जीबी रॅम दाखविण्यात आला आहे. तसेच वेबसाइट वर या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन लीक वरून समजले आहे की मोटो जी7 चा हा मॉडेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह बाजारात येईल. या स्पेसिफिकेशन्स सोबत वेबसाइट च्या लिस्टिंग वरून समजले आहे की मोटो जी7 डुअल रियर कॅमेर्याला सपोर्ट करेल.
मोटो जी7 च्या या लिस्टिंग हा आगामी स्मार्टफोन कोणत्या देशात कोणत्या मॉडेल नंबर सह लॉन्च होईल hi माहिती पण आहे. या लिस्टिंग मध्ये मोटो जी7 च्या इंडियन वर्जनचा मॉडेल नंबर एक्सटी1965-4 सांगण्यात आला आहे. म्हणजे मोटोरोला मोटो जी7 भारतात एक्सटी1965-4 मॉडेल नंबर सह लॉन्च करेल. पण मोटो जी7 आॅफिशियली समोर यायला अजून वेळ आहे. तोपर्यंत फोन संबधित सर्व अपडेट तुमच्या पर्यंत पोहोचवले जातील.
