लेनोवो अधिकृत कंपनी मोटोरोलाने यावर्षी फेब्रुवारी मध्ये आपला मोटो जी8 पावर स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने Moto G8 Power Lite अधिकृतरित्या लॉन्च केला आहे. फोन कंपनीने Royal Blue आणि Arctic Blue कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे.
किंमत
Moto G8 Power Lite च्या किंमतीबाबत बोलायचे तर हा डिवाइस 169 euros (जवळपास 13,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. या किंमतीत स्मार्टफोन Mexico आणि Germany मध्ये विकला जाईल. इतकेच नव्हे तर मोटो जी8 पावर लाइट इतर मार्केट्स जसे कि Latin America, Europe, Asia आणि Australia मध्ये पण सादर केला जाईल.
स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता Moto G8 Power Lite मध्ये 6.5-इंच IPS LCD मॅक्स विजन स्क्रीन देण्यात आली आहे. फोनच्या डिस्प्ले मध्ये एचडी+ रेजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल आहे. तसेच फोन मध्ये मीडियाटेक Helio P35 चिपसेट आणि 2.3GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी Moto G8 Power Lite च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये f/2.0 अपर्चर सह 16 मेगापिक्सल प्राइमरी शूटर, f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची 2cm फोकल लेंथ आणि डेप्थ सेंसर आहे. फोन मधील तिन्ही रियर कॅमेरा बोके, फेस ब्यूटी, एचडीआर, गूगल लेंस आणि इतर अनेक फीचर्सना सपोर्ट करतात. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
पावर बॅकअपसाठी G8 Power Lite मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचप्रमाणे हा हँडसेट एंडरॉयड 9 Pie ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी डुअल 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth 4.2, GPS, microUSB 2.0 आणि 3.5mm ऑडियो जॅक आहे.
