लेनोवो अधिकृत मोटोरोला ने ऑगस्ट मध्ये आपल्या झेड सीरीज अंतर्गत मोटो झेड3 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन यासाठी खास होता कि झेड3 सोबत कंपनी ने आपला 5जी मोटो मोड पण सादर केला होता. हा मोटो मोड वापरून मोटोरोला फोन मध्ये 5जी कनेक्टिविटी मिळवता येत होती. तर आता मोटोराला च्या या सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन मोटो झेड4 बद्दल लीक समोर आला आहे ज्यावरून समजले आहे की कंपनी मोटो झेड4 वर काम करत आहे आणि लवकरच हा फोन क्वालकॉम च्या आगामी लेटेस्ट चिपसेट सह बाजारात येईल.
एक्सडीए डेवलेपर्स ने आपल्या रिपोर्ट मध्ये मोटो झेड4 चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. रिपोर्ट मध्ये मोटो झेड4 चे कोडनेम ‘ओडीन’ सांगण्यात आले आहे. या लीक मध्ये सांगण्यात आले आहे की मोटो झेड4 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8150 चिपसेट असेल. विशेष म्हणजे क्वालकॉम ने अजून हा चिपसेट लॉन्च केलेला नाही. म्हणजे झेड4 अगदी नवीन आणि पावरफुल चिपसेट सह बाजारात येईल.
लीक अनुसार मोटो झेड4 वर सध्या काम चालू आहे आणि या फोनची टेस्टिंग चालू आहे. या टेस्टिंग मध्ये फोन 4जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे या वेरिएंट मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच रिपोर्टनुसार मोटो झेड4 एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला जाईल. मोटो झेड4 मोटोरोलाच्या 5जी मोटो मोडला सपोर्ट करेल. म्हणजे मोटो झेड4 मध्ये 5जी स्पीड वर इंटरनेट वापरता येईल. या फोन मध्ये इन डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळू शकतो.
मोटो झेड4 ची सर्वात मोठी खासियत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8150 चिपसेट आहे. हा चिपसेट 7एनएम टेक्नोलॉजी वर बनेल. विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगन 8150 चिपसेट पहिला असा चिपसेट असेल जो या टेक्नोलॉजी सह येईल. ही टेक्नोलॉजी या चिपसेट फास्ट आणि दमदार प्रोसेसिंग करण्यास सक्षम करेल. सध्या क्वालकॉमचाच स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सर्वात पावरफुल चिपसेट आहे. तर स्नॅपड्रॅगन 8150 ला एनटूटू बेंचमार्क डेटाबेस मध्ये 3,62,292 प्वाइंट्स देण्यात आले आहेत.
