मोटोरोलाने भारतीय बाजारात motorola edge 50 स्मार्टफोन लाँच केला आहे. जो आतापर्यंत जगातील सर्वात पातळ मिलिट्री ग्रेड रेटिंग असलेला डिव्हाईस आहे. म्हणजे की यावर शॉक, वाईब्रेशन, प्रेशर, डस्ट, हाई टेंपरेचर, लो टेंपरेचर, फॉग सारख्या स्थितीमध्ये पण काही होत नाही. तसेच फोनला IP68 रेटिंग पण प्राप्त आहे. जो याला पाण्यामध्ये पडल्यावर पण काही होऊ देत नाही. मजबूती बॉडीसह परफॉर्मन्ससाठी 8 जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, चांगल्या फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल कॅमेरा, दमदार बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. चला, पुढे मोबाईलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
motorola edge 50 ची किंमत आणि उपलब्धता
- कंपनीने edge 50 स्मार्टफोनला सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणले आहे. डिव्हाईसची एकमात्र 8GB रॅम +256 जीबी स्टोरेजची किंमत 27,999 वर ठेवण्यात आली आहे.
- ब्रँडद्वारे डिव्हाईसवर 2,000 रुपयांचा इंस्टंट बँक डिस्काऊंट मिळेल. त्यानंतर युजर्स फोनला मात्र 25,999 रुपयांमध्ये खरेदी करतील.
- डिव्हाईसची सेल येत्या 8 ऑगस्टपासून दुपारी 12:00 वाजता फ्लिपकार्ट आणि आणि इतर रिटेल आऊटलेटवर सुरु होईल.
- फोन जंगल ग्रीन आणि पॅनटोन पीच फज कलरमध्ये वेगन लेदर फिनिशसह सादर झाला आहे. तर Koala Grey कलर vegan suede फिनिश मध्ये येतो.
motorola edge 50 चे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले
- 6.67 इंचाची pOLED स्क्रीन
- 120Hz रिफ्रेश रेट
मोटरोलाच्या नवीन स्मार्टफोन edge 50 मध्ये कंपनीने 6.67 इंचाचा मोठा pOLED डिस्प्ले प्रदान केला आहे. हा पॅनल 1.5 के सुपर एचडी 3D कर्व असलेला आहे. यावर 100% DCI P3 कलर गमट, 1900निट्स पीक ब्राइटनेस, 120Hz रिफ्रेश रेट, 10 बिलीयन कलरला सपोर्ट दिला आहे. तसेच डिव्हाईसमध्ये स्मार्ट वॉटर टच फिचर पण उपलब्ध आहे. म्हणजे पाणी किंवा ओल्या हाथांनी पकडल्यावर पण तुम्ही याचा वापर करू शकता.
प्रोसेसर
- स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 एक्सेलेरेटेड एडिशन
- वेपर चेंबर कूलिंग सिस्टम
कंपनीने दमदार परफॉर्मन्ससाठी यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 एक्सेलेरेटेड एडिशन चिपसेट लावली आहे. हा चार नॅनोमीटर प्रक्रियावर चालतो. त्याचबरोबर वेपर चेंबर कूलिंग सिस्टमचा उपयोग हीटिंग होत नाही. एकूण मिळून पाहिले तर स्मार्टफोन खूप चांगली अनुभव देण्यासाठी काबिल आहे.
स्टोरेज
- 8 जीबी रॅम
- 256GB स्टोरेज
डाटा स्टोर करण्यासाठी motorola edge 50 मध्ये कंपनीने 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे. त्याचबरोबर व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीच्या मदतीनं रॅमला वाढविले पण जाऊ शकते.
कॅमेरा
- 50MP मेन कॅमेरा
- 32MP फ्रंट कॅमेरा
कॅमेरा फिचर्स पाहता motorola edge 50 ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह लाँच झाला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा सोनी LYT-700C प्रायमरी सेन्सर आहे. त्याचबरोबर 13 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 10 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स लावली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ब्रँडने 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
बॅटरी
- 5,000 एमएएच बॅटरी
- 68W फास्ट चार्जिंग
- 15W वायरलेस चार्जिंग
फोनला चालवण्यासाठी यात कंपनीने 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. दावा आहे की हा जास्त वेळाचा बॅकअप प्रदान करतो, याला फास्ट चार्ज करण्यासाठी 68 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आणि 15 वॉट वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे.
इतर
- इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर
- IP68 रेटिंग
- MIL-810H Military Grade रेटिंग
इतर फिचर्स पाहता motorola edge 50 पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP68 रेटिंग आहे. यात ड्युअल सिम 5 जी, 4 जी, वाय-फाय ब्लूटूथ, MIL-810H Military Grade रेटिंग, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, कॅमेऱ्यासाठी AI फिचर्स सारखे अनेक पर्याय आहेत.
ऑपरेटिंग सिस्टम
- अँड्रॉईड 14
- 2 वर्षाचे ओएस अपडेट
motorola edge 50 लेटेस्ट अँड्रॉईड 14 वर लाँच करण्यात आला आहे. ज्याच्यासोबत 2 वर्षाचे ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड आणि 3 वर्षाचे सिक्योरिटी अपडेट मिळेल.
