Motorola ने आज आपल्या ऑनलाइन इवेंटच्या माध्यमातून Motorola Edge+ लॉन्च केला आहे. या फ्लॅगशिप फोन बद्दल अनेक दिवसांपासून लीक व बातम्या समोर येत होत्या, ज्या वर आज पूर्णविराम लावत कंपनीने हा हँडसेट अधिकृतपणे लॉन्च केला आहे. या डिवाइस सोबतच कंपनीने Motorola Edge स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे चला जाऊन घेऊया Motorola Edge+ फोनची डिजाइन, स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि उपलब्धतेची माहिती.
डिजाइन
Motorola Edge+ बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे जो शानदार दिसतो. तसेच स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनल वर सिंगल होल-पंच देण्यात आला आहे, ज्यात फ्रंट कॅमेरा आहे. डिवाइसच्या बॉटमला टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि 3.5एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे. फोन कर्व्ड बॅक पॅनल सह येतो. फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा वर्टिकल शेप मध्ये आहे, ज्यात वरचा सेंसर मोठा आणि दुसरे दोन सेंसर आकाराने छोटे आहेत. वर्टिकल कॅमेरा सेटअपच्या मधोमध एलईडी फ्लॅश लाइट आणि मध्ये मोटो चा लोगा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या डावीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर ऑन-ऑफ बटण आहे.
डिस्प्ले
मोटोरोला एज+ फोन मध्ये 6.67 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल्स) डिस्प्ले आहे, ज्याची पिक्सल डेनसिटी 440पीपीआई असेल. तसेच फोन मध्ये दोन्ही बाजुंना डिस्प्ले आहे. स्मार्टफोन्स मध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. हा पारंपरिक 60 हर्ट्ज डिस्प्लेच्या तुलनेत 50% जास्त रिफ्रेश रेट देतो. याचा फायदा तेव्हा होतो जेव्हा तुम्ही स्क्रीन स्वाइप करता. हा स्मूद आणि सीमलेस विजुअल एक्सपीरियंस देतो.
दमदार कॅमेरा
कॅमेरा पाहता या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये ज्याचा प्राइमरी कॅमेरा f/1.8 अपर्चर सह 108 मेगापिक्सल (with OIS) + टेलीफोटो लेंस (with OIS) + 16 मेगापिक्सल अल्ट्रावाइड (doubles up as macro) ToF सेंसर आणि 8 मेगापिक्सल लेजर ऑटोफोकस आहे. तसेच फोन मध्ये 3X ऑप्टिकल झूम क्षमता पण देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा सिंगल होल-पंच कॅमेरा आहे.
प्रोसेसर, रॅम व स्टोरेज
Motorola Edge+ मध्ये फोन मध्ये चांगल्या परफॉर्मेंससाठी लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 5G सपोर्ट सह येतो. तसेच फोन मध्ये 12GB की रॅम आणि 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे.
बॅटरी, ऑपरेटिंग सिस्टम आणि कनेक्टिविटी
मोटोरोलाच्या या फ्लॅगशिप फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W टर्बो चार्ज (वायर सह) आणि वायरलेस 15W ला सपोर्ट करते. तसेच फोन मध्ये वायरलेस पावरशेयर म्हणजे रिवर्स वायरलेस चार्जिंगचा पर्याय देण्यात आला आहे. जर तुमच्याकडे असा डिवाइस असेल जो वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो तर तुम्ही तो डिवाइस या मोबाईल द्वारे चार्ज करू शकता.
Motorola Edge+ ची किंमत आणि उपलब्धता
Motorola Edge+ ची किंमत पाहता कंपनीने हा €599 (जवळपास 50,000 रुपये) मध्ये सादर केला आहे. हँडसेट भारतात लॉन्च केला जाईल. पण तारखेबाबत अजूनही माहिती समोर आली नाही. Motorola Edge Plus Thunder Grey आणि Smoky Sangria hues कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल.
वीडियो
