Home बातम्या 2 ऑगस्टला आहे मोटोरोला चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात मोटो वन, मोटो वन पावर आणि मोटो झेड3

2 ऑगस्टला आहे मोटोरोला चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात मोटो वन, मोटो वन पावर आणि मोटो झेड3

मोटोरोला बद्दल काही दिवसांपूर्वी अनेक लीक्स आले आहेत. या लीक्स मध्ये एकीकडे मोटो झेड3 स्मार्टफोन च्या बातम्या आल्या आहेत तर दुसरीकडे अशी माहिती मिळाली आहे की मोटोरोला पण आता नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन सेग्मेंट मध्ये एंट्री करणार आहे आणि याची सुरवात मोटो वन पावर स्मार्टफोन पासून होईल. आता असे वाटत आहे की मोटोरोला लवकरच या लीक्स आणि बातम्यांना पूर्ण विराम देणार आहे. मोटोरोला ने घोषणा केली आहे की कंपनी येत्या 2 ऑगस्टला शिकागो मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मधून मोटोरोला चे नवीन स्मार्टफोंस जगासमोर येतील.

मोटोरोला ने 2 ऑगस्टला होणार्‍या ईवेंट ची माहिती दिली आहे. मोटोरोलाचा हा ईवेंट शिकागो मधील मोटोरोला हेडक्वॉर्टर मध्ये आयोजित केला जाईल जो दुपारी 2 वाजता सुरू होईल. पण मोटोरोला ने हे सांगितले नाही की हा ईवेंट का केला जात आहे आणि ईवेंट मधून कोणते स्मार्टफोन समोर येतील. पण बोलले जात आहे की या प्रोग्राम मध्ये कंपनी एक पेक्षा जास्त अनाउंसमेंट करणार आहे आणि या ईवेंट मधून मोटो वन पावर, मोटो वन आणि मोटो झेड3 टेक बाजारात येतील.

विशेष म्हणजे मोटो झेड3 कंपनी च्या फ्लॅगशिप सेग्मेंट वाला स्मार्टफोन असेल तर मोटो वन सीरीज अंतर्गत लॉन्च होणारे स्मार्टफोंस स्टॉक एंडरॉयड आधारित असतील. तसेच मोटो वन पावर स्मार्टफोन कंपनी चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन म्हणून समोर येईल. त्याचबरोबर ताज्या लीक मध्ये मोटो वन बद्दल माहिती मिळाली आहे की हा फोन पण नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाऊ शकतो.

लीक नुसार मोटो वन पावर मध्ये 6.2-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेल. लीक नुसार या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला जाईल त्याचबरोबर फोन ची इंटरनल स्टोरेज 64जीबी असेल आणि यात 3,780एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. तसेच मोटो झेड3 बद्दल बोलले जात आहे की मोटोराला हा फोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आणेल जो पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येईल.