Lenovo अधिकृत कंपनी Motorola ने गेल्या महिन्यात ग्लोबल मार्केट मध्ये आपली फ्लॅगशिप सीरीज ‘मोटोरोला ऐज सीरीज’ सादर केली होती. या इस सीरीज मध्ये Motorola Edge आणि Motorola Edge+ लॉन्च केले गेले होते. आज कंपनीने इंडियन मार्केट मध्ये आपला नवीन फ्लॅगशिप फोन Motorola Edge+ लॉन्च केला आहे. या फोनची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट द्वारे केली जाईल. तसेच फोनची सर्वात खास बाब फोन मध्ये देण्यात आलेला 108 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. याच कॅमेऱ्यासह इंडियन मार्केट मध्ये शाओमीने काही दिवसांपूर्वी मी 10 सादर केला होता जो विक्रीसाठी मार्केट मध्ये आला आहे.
डिजाइन
Motorola Edge+ बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे जो दिसायला खूप शानदार आहे. स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनल वर सिंगल होल-पंच देण्यात आलेला आहे, ज्यात फ्रंट कॅमेरा आहे. तसेच डिवाइसच्या बॉटमला टाइस-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि 3.5एमएम हेडफोन जॅक देण्यात आलेला आहे. फोन कर्व्ड बॅक पॅनल सह येतो. फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा वर्टिकल शेप मध्ये आहे, ज्यात टॉप सेंसर मोठा आणि दुसरे दोन सेंसर आकाराने छोटे आहेत. वर्टिकल कॅमेरा सेटअपच्या मधोमध एलईडी फ्लॅश लाइट आणि बॅक पॅनेलच्या मधोमध मोटोचा लोगो देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर फोनच्या उजवीकडे मध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर ऑन-ऑफ बटण आहे.
दमदार कॅमेरा
कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. या सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा f/1.8 अपर्चर सह 108 मेगापिक्सल (with OIS) + टेलीफोटो लेंस (with OIS) + 16 मेगापिक्सल अल्ट्रावाइड (doubles up as macro) ToF सेंसर आणि 8 मेगापिक्सल लेजर ऑटोफोकस आहे. तसेच फोन मध्ये 3X ऑप्टिकल झूम क्षमता पण देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा सिंगल होल-पंच कॅमेरा आहे.
स्पेसिफिकेशन्स
मोटोरोलाच्या या फोन मध्ये 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.67 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. हा पारंपारिक 60 हर्ट्ज डिस्प्लेच्या तुलनेत 50% जास्त रिफ्रेश रेट देतो. तसेच फोन एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 वर चालतो. हा चिपसेट 5G सपोर्ट सह येतो. हा फोन 12 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
मोटोरोलाच्या या फ्लॅगशिप फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W टर्बो चार्ज (वायर सह) आणि वायरलेस 15W ला सपोर्ट करते. तसेच फोन मध्ये वायरलेस पावरशेयर म्हणजे रिवर्स वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. तुमच्याकडे वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणारा डिवाइस असेल तर तुम्ही तो डिवाइस या रिवर्स चार्जिंगच्या माध्यमातून चार्ज करू शकता.
किंमत
Motorola Edge+ भारतात 74,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. किंमत आणि स्पेसिफिकेशन्स याला प्रीमियम स्मार्टफोन बनवतात. फोन कंपनीने Smokey Sangria आणि Thunder Grey कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. आशा आहे कि फोनची विक्री 26 मे पासून सुरु होईल. तसेच फोनची प्री-बुकिंग फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल स्टोर वर आज पासून सुरु झाली आहे. मोटोरोला एज+ सह ICICI क्रेडिट कार्ड वर 7,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट / कॅशबॅक पण मिळेल.
वीडियो
