Motorola ने या आठवड्यात भारतात आपला नवीन स्मार्टफोन Moto G9 Power लाॅन्च केला आहे. हा मोबाईल फोन 11,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला आहे जो येत्या 15 डिसेंबर पासून शाॅपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतात मोटो जी9 पावर लाॅन्च झाल्यानंतर आता कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात पण आपल्या डिवायसची संख्या वाढवणार आहे. बातमी आली आहे कि कंपनी Moto G Stylus (2021) लवकरच टेक मंचावर घेऊन येणार आहे आणि तसेच लाॅन्चच्या आधी हा फोन शाॅपिंग साइट वर लिस्ट पण झाला आहे.
Moto G Stylus (2021) अमेझॉन यूएस वेबसाइट वर लिस्ट करत फोनचे प्रोडक्ट पेज ऑफिशियल करण्यात आले होते. हि लिस्टिंग अमेझॉनच्या चुकीमुळे झाली होती जी नंतर सुधारण्यात आली आणि प्रोडक्ट पेज काढून टाकण्यात आले. पण तेवढ्या काळात फोनचे वेरिएंट्स आणि किंमत सार्वजनिक झाली ज्यामुळे फोनच्या किंमतीची माहिती समोर आली आहे. अमेझॉन वर मोटो जी स्टाईलस 2021 341.89 यूएस डाॅलर मध्ये लिस्ट केला गेला होता. हि किंमत भारतीय करंसीनुसार 25,000 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे कि फोन या किंमतीत बाजारात येईल.
मोटोरोलाचा हा आगामी डिवायस अमेझॉन यूएस वर Aurora Black आणि Aura White कलर वेरिएंट्स मध्ये दाखवण्यात आला होता. तसेच अमेझॉन वर लिस्ट स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.8 इंचाच्या पंच-होल डिस्प्ले सह मार्केट मध्ये लाॅन्च होईल. इथे फोनच्या बॅक पॅनल वर चौकोनी रियर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे तसेच उजव्या पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. अमेझॉन वर फोन मध्ये 4 जीबी की रॅम आणि 4,000एमएएच ची बॅटरी असलयाचे पण समोर आले आहे.
Moto G9 Power
मोटो जी9 पावर पाहता हा फोन 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो एचडीआर 10ला सपोर्ट करतो. फोन एंडराॅयड 10 वर लाॅन्च केला गेला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर वर चालतो. भारतात हा फोन 4 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी फोनच्या रियर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
मोटो जी9 पावरची सर्वात मजबूत बाब आहे याचा बॅटरी बॅकअप. या फोन मध्ये कंपनीने 6,000 एमएएचची बॅटरी 22 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. या बॅटरी बद्दल कंपनीचे म्हणणे आहे कि हि बॅटरी 60 तास तुम्हाला सोबत देईल. कनेक्टिविटी फीचर्स पाहता, यात Wi-Fi 802.11 ac, ब्लूटूथ वी5, एनएफसी, यूएसबी टाइप-सी, 3.5एमएम ऑडियो जॅक आणि 4जी एलटीईचा समावेश आहे.
