Motorola ने फेब्रुवारी मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात ‘जी सीरीज’ चे दोन नवीन मोबाईल फोन लॉन्च केले होते ज्यात Moto G10 आणि Moto G30 चा समावेश होता. हे दोन्ही स्मार्टफोन यूरोपियन मार्केटमध्ये आले होते जे आता भारतात येण्यासाठी तयार आहेत. कंपनीने घोषणा केली आहे कि मोटोरोला भारतात आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे जे ‘जी’ सीरीज मध्ये सादर केले जातील. दोन्ही फोन लो बजेट सेग्मेंट मध्ये येतील. आता फक्त फक्त लॉन्च डेट समोर येण्याची वाट बघावी लागले. (motorola moto g10 g30 coming in india price specs sale offer)
मोटोरोला इंडियाने आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवर ट्वीट करून नवीन लॉन्चची माहिती दिली आहे. मोटोरोलाने लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे सांगितली नाहीत पण स्पष्ट केले आहे कि आगामी डिवायस ‘जी’ सीरीजमध्ये जोडले जातील. मोटोरोला आपला लॉन्च #AsliAllRounders हॅशटॅगसह प्रोमोट करत आहे. फोनची लॉन्च डेट समोर येताच हि बातमी अपडेट करून वाचकांना माहिती दिली जाईल.
Brace yourselves as you are about to get all you want in your smartphone. #AsliAllRounders coming soon! pic.twitter.com/yWaAqu3g1h
— Motorola India (@motorolaindia) March 4, 2021
Moto G10 आणि Moto G30
यूरोप मध्ये लॉन्च झालेल्या मोटो जी10 आणि मोटो जी30 दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 x 1,600 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. तसेच Moto G30 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि Moto G10 मध्ये 60Hz रिफ्रेश रेट आहे. प्रोसेसिंगसाठी मोटो G30 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे तर मोटो जी10 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेटला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा : जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला आणि सर्वात बारीक 5G फोन Vivo S9 झाला लॉन्च, सोबत वीवो S9e ची झाली एंट्री
दोन्ही फोनमध्ये कॅमेरा फीचर्स आणि सेंसर एक सारखे आहेत फक्त मेन सेंसर वेगळा आहे. Moto G30 मध्ये मागे अपर्चर f/1.7 सह 64MP चा मेन सेंसर क्वाड पिक्सल टेकसह देण्यात आला आहे. तर, Moto G10 मध्ये अपर्चर f/1.7 आणि नाइट विजनसह 48MP कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा (118º) आहे. डिवाइसमध्ये टेलिफोटो कॅमेऱ्याच्या जागी हाई रिजोल्यूशन मेन सेंसर देण्यात आला आहे जो झूमसह येतो. फोन मध्ये 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे.
Moto G30 मध्ये 4GB आणि 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते. तसेच, मोटो जी10 मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेजसह 4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट आहेत आणि मोटो जी30 प्रमाणे माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज वाढवता येते.
हे देखील वाचा : स्टाईलची लढाई पुन्हा जिंकेल Samsung, घेऊन येत आहे अनोखी डिजाईन असलेला Galaxy A82 5G फोन
दोन्ही 4 जी फोन (कॅट 4) आहेत, ज्यात कनेक्टिविटी ऑप्शनसाठी वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, एनएफसी आणि अनेक प्रकारचा सॅटेलाइट पोजिशनिंग सिस्टम सपोर्ट देण्यात आला आहे. वायर्ड कनेक्टिविटी मध्ये यूएसबी-सी (2.0 वायर्ड) आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकचा समावेश आहे. फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. पावर बॅकअपसाठी फोन्समध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे जी एकदा चार्ज केल्यावर दोन दिवस वापरता येते.
