Motorola ने इंडियन मार्केटमध्ये आज आपली ‘जी’ सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Moto G30 आणि Moto G10 Power लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन लो बजेट मध्ये सादर करण्यात आले आहेत जे या महिन्यात सेलसाठी उपलब्ध होतील. मोटो जी30 10,999 रुपयांच्या किंमतीत बाजारात आला आहे तर मोटो जी10 पावर ने 9,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री केली आहे. मोटो जी10 पावर 6,000एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करतो.
Moto G10 Power
मोटोरोला मोटो जी10 पावर बद्दल बोलायचे तर हा मोबाईल फोन पण बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर झाला आहे. फोनची स्क्रीन तीन बाजूंनी बेजल लेस आहे खालच्या बाजूला रुंद बॉडी पार्ट आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेली नॉच देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मॅक्स विजन डिस्प्लेला सपोर्ट करतो. मोटोरोलाचा हा फोन आईपी52 रेटेड आहे.
Moto G10 Power एंडरॉयड 11 ओएसच्या ‘स्टॉक’ वर लॉन्च केला गेला आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 460 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा फोन 4 जीबी रॅम मेमरीसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे ज्यात मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी मोटो जी10 पावर क्वॉड रियर कॅमेर्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा मोटोरोला फोन एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Moto G10 Power एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. या फोनमध्ये डेडिकेटेट गूगल असिस्टेंट बटन पण देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड मोटो लोगो आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी मोटो जी10 पावर स्मार्टफोन 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा येत्या 16 मार्च पासून फक्त 9,999 रुपयांमध्ये Aurora Grey आणि Breeze Blue कलर मध्ये विकत घेता येईल.
