मोटोरोला ने अनेक दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि कंपनी 7 फेब्रुवारीला आपली मोटो जी7 सीरीज सादर करणार आहे. त्यानुसार काल कंपनी ने ब्राजील मध्ये ईवेंटचे आयोजन करून आपला लेटेस्ट मोटो जी7 समोर आणला आहे. मोटोरोला ने या ईवेंट मध्ये मोटो जी7, मोटो जी7 प्ले, मोटो जी7 प्लस आणि मोटो जी7 पावर स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मोटो जी7 प्ले आणि मोटो जी7 पावर रेग्यूलर नॉच सह सादर केले गेले आहेत तर मोटो जी7 प्लस आणि मोटो जी7 मध्ये ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे.
मोटो जी7
हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2270 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.24-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनी ने मोटो जी7 मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल मेमरी दिली आहे जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येते. एंडरॉयड 9 पाई सह मोटो जी7 1.8गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.
फोटोग्राफी साठी मोटो जी7 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन आईपी154 रेटिड आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत मोटो जी7 मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
मोटो जी7 प्ले
मोटो जी7 सीरीज मध्ये हा सर्वात स्वस्त फोन आहे. कंपनीने हा 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.7-इंचाच्या डिस्प्ले वर सादर केला आहे. मोटो जी7 प्ले मध्ये 2जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येते. एंडरॉयड 9 पाई सह हा फोन 1.8गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.
फोटोग्राफी साठी मोटो जी7 प्ले 13-मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्यासह 8-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत मोटो जी7 प्ले मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
मोटो जी7 पावर
मोटो जी7 मध्ये हा फोन सर्वात मोठ्या बॅटरी साठी ओळखला जातो. नावाप्रमाणे मोटो जी7 पावर मध्ये 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची बॅटरी 15वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन की स्पेसिफिकेशन्सचे पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सह मोटो जी7 पावर क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.
कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी रॅम तसेच 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड द्वारे 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो जी7 पावर च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी मोटो जी7 पावर 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
मोटो जी7 प्लस
मोटो जी7 प्लस मोटोरोला च्या नव्या स्मार्टफोन सीरीजचा सर्वात पावरफुल आणि महाग स्मार्टफोन आहे. 19:9 आस्पेक्ट रेशियो सह हा स्मार्टफोन 2,270 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.24-इंचाच्या टीयरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. मोटो जी7 प्लस 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज वर सादर केला गेला आहे जी कार्ड द्वारे 512जीबी पर्यंत एक्सपांड होऊ शकते. हा फोन पण एंडरॉयड 9 पाई सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर चालतो.
फोटोग्राफी साठी मोटो जी7 प्लस डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत मोटो जी7 प्लस मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत
मोटो जी7 प्ले = R$999 (अंदाजे 19,000 रुपये)
मोटो जी7 पावर = R$1,399 (अंदाजे 26,900 रुपये)
मोटो जी7 = R$1,599 (अंदाजे 30,700 रुपये)
मोटो जी7 प्लस = R$1,899 (अंदाजे 36,500 रुपये)
