मोटोरोला ने याच आठवड्यात आपल्या इंडियन फॅन्सना भेट देत घोषणा केली होती कि कंपनी लवकरच भारतात मोटो जी7 सीरीज वाढवणार आहे. मोटोरोला ने आपल्या आफिशियल ट्वीटर हॅंडल वरून मोटो जी7 सीरीजच्या इंडिया लॉन्चची माहिती दिली पण कंपनी लॉन्च तारीख सांगितली नव्हती. आता होळीच्या निमित्ताने इंडियन यूजर्सना खुश करत मोटोरोला ने घोषणा केली आहे कि पुढल्याच आठवड्यात 25 मार्चला मोटो जी7 सीरीजचे फोन भारतीय बाजारात येतील.
मोटोरोला इंडिया ने सांगितले आहे कि येत्या 25 मार्चला मोटो जी7 सीरीजचा विस्तार भारतीय बाजारात केला जाईल. विशेष म्हणजे यादिवशी मोटो जी7 सीरीजचा फक्त एकच स्मार्टफोन मोटो जी7 भारतात लॉन्च केला जाईल. 25 मार्चला लॉन्च झाल्यांनतर मोटो जी7 कोणत्या किंमतीत आणि कधी सेल साठी उपलब्ध होईल यासाठी फोन लॉन्चची वाट बघावी लागेल.
लक्षात असू दे कि मोटोरोला अंर्तराष्ट्रीय मंचावर मोटो जी7 सीरीज मध्ये 4 शानदार स्मार्टफोन सादर केले आहेत ज्यात मोटो जी7, मोटो जी7 प्ले, मोटो जी7 प्लस आणि मोटो जी7 पावर स्मार्टफोनचा समावेश आहे. या चार पैकी मोटो जी7 पावर इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आधीच उपलब्ध झाला आहे तर आता 25 मार्चला मोटो जी7 सीरीजचा मोटो जी7 स्मार्टफोन पण भारतीय बाजारात येईल.
वनप्लस 6टी चे 7 फीचर्स जे आहेत इतरांपेक्षा वरचढ
मोटो जी7
हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2270 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.24-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनी ने मोटो जी7 मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल मेमरी दिली आहे जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येते. एंडरॉयड 9 पाई सह मोटो जी7 1.8गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.
फोटोग्राफी साठी मोटो जी7 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन आईपी154 रेटिड आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत मोटो जी7 मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
6जीबी रॅम वाला पोको एफ1 झाला 2,000 रुपयांनी स्वस्त, कुठे आणि कसा घ्यावा विकत वाचा सविस्तर
मोटो जी7 पावर
मोटो जी7 मध्ये हा फोन सर्वात मोठ्या बॅटरी साठी ओळखला जातो. नावाप्रमाणे मोटो जी7 पावर मध्ये 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची बॅटरी 15वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन की स्पेसिफिकेशन्सचे पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सह मोटो जी7 पावर क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.
कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी रॅम तसेच 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड द्वारे 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो जी7 पावर च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी मोटो जी7 पावर 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
