Home बातम्या Moto G85 5G फोनचे स्पेसिफिकेशन आले समोर, लाँचच्या आधी ही जाणून घ्या या फोनमध्ये काय मिळेल खास

Moto G85 5G फोनचे स्पेसिफिकेशन आले समोर, लाँचच्या आधी ही जाणून घ्या या फोनमध्ये काय मिळेल खास

Motorola आपल्या जी सीरीजच्या नवीन स्मार्टफोन Moto G85 5G वर काम करत आहे ज्यामुळे मागच्या अनेक दिवसांमध्ये अनेक लीक व रिपोर्ट्समध्ये पाहिले गेले आहे. तसेच आता हा मोबाईल फोन चीनी सर्टिफिकेशन साईट टेनावर पण लिस्ट झाला आहे जिथे मोटो जी 85 5 जी चे अनेक महत्त्वाचे स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. आगामी Moto G85 5G फोनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Moto G85 5G चे स्पेसिफिकेशन (टेना)

स्क्रीन : Moto G85 ला टेनावर 6.8-इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीनसह दाखविण्यात आले आहे. लिस्टिंगनुसार फोनमध्ये curved-edge स्क्रीन दिली जाईल जी OLED पॅनलवर बनली आहे. स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी पण दिली जाऊ शकते.

प्रोसेसर : टेना नुसार मोटो जी 85 स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल जो 2.3GHz क्लॉक स्पीडवर रन करण्याच्या क्षमतेसह आहे. तसेच मागच्या अनेक दिवसांपासून समोर आलेल्या गीकबेंच लिस्टिंगमध्ये हा फोन क्वॉलकॉम Snapdragon 4 Gen 3 चिपसेटसह सांगितला आहे.

बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी नवीन मोटोरोला स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा मिळेल. टेना नुसार याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर दिला जाईल जो 8 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सरसह मिळून काम करेल.

फ्रंट कॅमेरा : टेना लिस्टिंगमध्ये समोर आले आहे की सेल्फी तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी Moto G85 स्मार्टफोन 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी मोटो जी 85 मध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाणार असल्याची माहिती टेनावर मिळाली आहे. फोनमध्ये किती वॉटची फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल याची अजून माहिती मिळाली नाही.

इतर फिचर्स : ऑनर 200 लाईटमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5GHz Wi-Fi, Bluetooth 5.1 तसेच OTG सारखे पर्याय मिळतात. तसेच सिक्योरिटीसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Moto G85 5G फोटो (लीक)

Moto G85 5G ची किंमत (लीक)

काही आठवड्यांपूर्वी मोटो जी85 5जी फोन एक युरोपियन रिटेलर्स वेबसाईटवर 12GB RAM + 256GB Storage सह लिस्ट झाला होता. रिपोर्टमध्ये या फोनची किंमत €300 सांगण्यात आली होती जी भारतीय चलनानुसार 26,900 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे की हा फोन भारतीय बाजारात याला कमी किंमतीत लाँच होईल. तसेच भारतीय बाजारात यावेळी 12GB+256GB Moto G84 5G 18,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.