सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत. दरवर्षी प्रमाणे सर्व आॅनलाईन शॉपिंग साइट्स शॉपिंग डेज ची सुरवात करणार आहेत, तसेच स्मार्टफोन कंपन्या पण आपल्या यूजर्सना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आॅफर घेऊन येत आहेत. यात मोटोरोला ने पण आपल्या फॅन्सचा आनंद द्विगुणित करत आपल्या दोन हिट स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. मोटोरोला प्राइस कट सोबतच आपल्या स्मार्टफोन्स च्या खरेदीवर शानदार व आर्कषक आॅफर्स पण देत आहे.
मोटोरोला ने आपल्या डुुअल रियर कॅमेर्या वाल्या दमदार स्मार्टफोन मोटो एक्स4 ची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे. मोटो एक्स4 चा 4जीबी रॅम वेरिएंट आधी 17,999 रुपयांमध्ये येत होता पण आता हा फोन 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे मोटो एक्स4 चा 3जीबी रॅम वेरिएंट 15,999 रूपयांच्या ऐवजी आता फक्त 13,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे.
त्याचबरोबर मोटोरोला इंडिया ने 5,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह येणार्या स्मार्टफोन मोटो ई5 प्लस ची किंमत पण एक हजार रुपयांनी कमी केली आहे. 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेला मॅक्स विजन डिस्प्ले वाला हा फोन आधी जो 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होता, तोच दमदार स्मार्टफोन आता 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. प्राइस कट सोबतच मोटोरोलाचे हे दोन्ही स्मार्टफोन्स जर तुम्ही पेटीएम वरून विकत घेतले तर 3,000 रुपयांचा कॅशबॅक पण मिळेल.
मोटोरोला स्मार्टफोन्स बजाज फिनसर्व वरून नो कॉस्ट ईएमआई ने पण विकत घेता येईल. मोटो एक्स4 आणि मोटो ई5 प्लस पेटीएम, मोटो हब सोबतच रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल. मोटोरोला कडून मिळणार्या सर्व आॅफर्सच्या माहितीसाठी इथे क्लिक करा
