रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Annual General Meeting) रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की जगभरातील ग्लोबल मोबाईल ट्रॅफिक चे 8 टक्के जिओकडे आहे. त्याचवेळी किफायतशीर असल्यामुळे जिओच्या सेवा प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत. 8 वर्षात जिओ जगातील सर्वात मोठी डेटा कंपनी बनली आहे. तसेच अंबानींनी यावेळी एआय एव्हरीव्हेअर फॉर एव्हरीवन व्हिजनला सपोर्ट करत जिओ एआय-क्लाऊड वेलकम ऑफरची घोषणा केली आहे.
100GB पर्यंत मोफत मिळेल क्लाऊड स्टोरेज
मुकेश अंबानी यांनी 100GB पर्यंत मोफत क्लाऊड स्टोरेज देण्याची घोषणा केली आहे. या स्टोरेजच्या मदतीने जिओचे ग्राहक त्यांचे सर्व फोटो, व्हिडिओ, दस्तऐवज, इतर सर्व डिजिटल कन्टेन्ट आणि डेटा यांना सुरक्षितपणे सेव्ह आणि ॲक्सेस करू शकतील. याशिवाय ते म्हणाले की आमच्याकडे त्या लोकांसाठी बाजारात सर्वात परवडणाऱ्या किमती देखील असतील ज्यांना आणखी स्टोरेजची गरज आहे.
दिवाळीत येईल जिओ एआय-क्लाऊड वेलकम ऑफर
मुकेश अंबानी यांनी एजीएम दरम्यान सांगितले की, आम्ही यावर्षी दिवाळीपासून जिओ एआय-क्लाऊड वेलकम ऑफर लाँच करण्याचा विचार करत आहोत, जो एक शक्तिशाली आणि परवडणारा उपाय आणेल जिथे क्लाऊड डेटा स्टोरेज आणि डेटा-चालित एआय सेवा प्रत्येकासाठी सर्वत्र उपलब्ध असतील.
जामनगर मध्ये बनणार गिगावॉट स्केल, एआय-रेडी डेटा सेंटर
एजीएम दरम्यान अंबानी म्हणाले की रिलायन्स गुजरातमधील जामनगर मध्ये गिगावॅट-स्केल, एआय-रेडी डेटा सेंटर उभारणार आहे. याशिवाय अत्याधुनिक एआय कार्यक्रम विकसित करण्यासाठी जिओ इन्स्टिट्यूटसोबत भागीदारी केली आहे. त्याचवेळी मुकेश अंबानी यांचे मत आहे की एआय सेवा लक्झरी नाहीत, त्याऐवजी एआय तंत्रज्ञान सर्व डिव्हाईसवर प्रत्येकासाठी उपलब्ध असले पाहिजे.
देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले एआयचे फायदे
अंबानींच्या मते एआयचा सर्वाधिक फायदा चार क्षेत्रांना होईल. या चार क्षेत्रांमध्ये कृषी – एआय शेतकरी (शेतीशी संबंधित नवीन शोध, कीटकनाशकांशी संबंधित प्रत्येक तपशील), शिक्षण – एआय शिक्षक (उच्च दर्जाचे शिक्षण देणे), हेल्थकेअर – एआय डॉक्टर्स (भारताला एक निरोगी आणि फिटनेस देश बनवणे), लघु व्यवसाय – एआय सोबत लहान व्यावसायिकांची शक्ती वाढेल आणि भारताला पुढे जाण्यास मदत होईल
