New OTT releases this week: तुमच्या आवडीचे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्या प्रमाणेच यावेळी देखील नवीन चित्रपट, वेब सीरीज आणि शोज रिलीज होण्यासाठी तयार आहेत. म्हणजे तुम्ही दिवाळीच्या मोठ्या सुट्टीनंतर आलेल्या विकेंडला शानदार कंटेंट स्ट्रीम करू शकाल. तुम्ही अॅक्शन, ड्रामा, रोमान्स तसेच मिस्ट्री असलेला कंटेंट बघू इच्छित असाल तर या आठवड्यात हाउस ऑफ द ड्रॅगन, फ्लेम्स सिझन 3, झांसी, इंडियन प्रीडेटर: मर्डर इन ए कोर्टरूम, द गुड नर्स, आणि अनेक नवीन रिलीज तुमची वाट पाहत आहेत. हे शो आणि चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनन प्राइम व्हिडीओ सारख्या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करता येतील. चला एक नजर टाकूया या आठवड्यातील सर्व ओटीटी रिलीजवर…
Flames चे दोन सिझन हिट झाल्यानंतर आता या शोचा तिसरा Season रिलीज झाला आहे. Flames Season 3 आज म्हणजे October 28 रोजी Amazon Prime Video वर स्ट्रीम करता येईल. TVF च्या Flames Season 3 वेब सीरीजमध्ये टीनएज रोमांटिक ड्रामा, मैत्री, हार्ट ब्रेक सारख्या घडामोडी दाखवण्यात आल्या आहेत. जर तुम्ही या सीरीजचे दोन सिझन बघितले असतील तर तुम्हाला सीरीजचे कॅरेक्टर्स माहित असतील. तसेच Flames Season 3 cast मध्ये यावेळी देखील Ritvik Sahore, Tanya Maniktala, Sunakshi Grover, Shivam Kakar, Deepesh Sumitra Jagdish आणि Debobrato सारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे.
झांसी एक अॅक्शन थ्रिलर ड्रामा सीरीज आहे, ज्यात अंजली मुख्य भूमिकेत आहेत. सीरीजमध्ये ती एक कुशल आणि इमानदार पोलीस अधिकारी आणि एक प्रेमळ पत्नी आणि आईची भूमिका साकारत आहे. तसेच तिला गोष्टी विसरण्याचा आजार आहे आणि तिचा भूतकाळ तिला आठवत नाही, परंतु अनेकदा ती आपल्या जुन्या आठवणींमुळे जागी होते. Jhansi सीरिज Disney Plus Hotstar वर बघता येईल.
इंडियन प्रीडेटर: मर्डर इन अ कोर्ट रूम एक खरी क्राइम स्टोरी आहे, जी बलात्कार, हत्या आणि वसूलीचा नागपूरच्या आरोपी अक्कू यादवच्या हत्येवर आधारित आहे. ही घटना 2004 मध्ये नागपुर जिल्हा न्यायालयात कोर्ट रूम नंबर 7 मध्ये यादवच्या जामिनावर सुनावणी दरम्यान घडली होती. ही सीरीज नेटफ्लिक्सवर बघता येईल.
डिज्नी प्लस हॉटस्टारचा बहुचर्चित शो ‘हाउस ऑफ द ड्रॅगन’ चा पहिला सिझन संपला आहे. हा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या लोकप्रिय सीरिजचा प्रीक्वल म्हणजे आधीची गोष्ट आहे. या सीरीजचा शेवटचा एपिसोड 23 ऑक्टोबरला रिलीज करण्यात आला होता. अधिकृतपणे स्ट्रीम होण्याआधीची या शोचा शेवटचा सिझन लीक देखील झाला होता. जर तुम्ही अजून पर्यंत या शोचा फायनल एपिसोड बघतील नसेल तर लवकरच बघून घ्या.
जर तुम्ही इंग्रजी सीरीज व चित्रपटांचे चाहते असाल तर नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला द गुड नर्स पाहू शकता. हा एक क्राइम ड्रामा थ्रिलर आहे ज्यात ऑस्कर विजेता जेसिका चॅस्टेनन आणि एडी रेडमायने यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, जो 26 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे.
द बास्टर्ड सन अँड द डेविल हिमसेल्फ netflix वर बघता येईल. ही सीरीज सॅली ग्रीनची कादंबरी हाफ बॅडवर आधारित आहे. गोष्ट नेथन बर्नच्या अवतीभवती फिरते, जो आतापर्यंतच्या सर्वात खतरनाक शैतान – मार्कस एजचा बेकायदेशीर मुलगा आहे. सीरीज आज Netflix वर रिलीज झाली आहे.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.