सॅमंसग गॅलेक्सी एस10 सीरीजची गेल्यावर्षी पासूनच माहिती समोर येत आहे. पुढील महिन्यात 20 फेब्रुवारीला सर्व लीक्स वर विराम लावत कंपनी हि सीरीज ऑफिशियली सादर करेल. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी या सीरीज मध्ये गॅलेक्सी एस10 लाइट, गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10+ आणि गॅलेक्सी एस10 सेरामिक लॉन्च करू शकते.
सॅमसंगकडून याबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती देण्या आलेली नाही पण लीक मधून अनेक बातम्या समोर आल्या आहेत. तसेच आता गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लसच्या लाइव ईमेज ऑनलाइन समोर आल्या आहेत. या ईमेज वरून डिवाइसच्या लुक आणि डिजाइनचा अंदाज लॉन्चच्या आधीच लावला जाऊ शकतो.
अलीकडेच सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10+ ची लाइव इमेज समोर आली होती, ज्यात सुरक्षित क्रिप्टोकरंसी दिसली होती. तर आता नवीन ईमेज मध्ये डिवाइसच्या डिजाइनचा अंदाज लावला जाऊ शकतो. दोन्ही डिवाइसच्या फ्रंटला पंच होल कॅमेरा असेल. एक डिवाइस मध्ये सिंगल पंच होल कॅमेरा असेल. तर दुसऱ्यात डुअल पंच होल कॅमेरा असेल. सिंगल पंच होल कॅमेरा असलेला डिवाइस गॅलेक्सी एस10 आणि डुअल पंच होल कॅमेरा असलेला डिवाइस गॅलेक्सी एस10 प्लस असेल. तसेच बॉटमला थिन चिन दिसत आहे.
तसेच मागे रियर कॅमेरा सेटअप हॉरिजोंटली प्लेसड आहे, त्यासोबत फ्लॅश यूनिट आणि नीचे खालच्या बाजूला सॅमसंगची ब्रॅंडिंग दिसत आहे. बॉटम ग्रिल मध्ये दिसत आहे कि फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल, 3.5 एमएम जॅक आणि माइक्रोफोन असेल. याआधीच्या रिपोर्टनुसार गॅलेक्सी एस10 मध्ये 5.8-इंचाचा इनफिनिटी ओ डिस्प्ले आणि एस10 प्लस मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले असेल. दोन्ही स्मार्टफोन्स बद्दल बोलले जात आहे कि यात सॅमसंगचा एक्सिनोस 9820 8एनएम एसओसी असेल.
सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि एस10+ बद्दल सांगण्यात आले आहे कि हे फोन मॉडेल 3डी फेशिअल आइडेंटिफिकेशन फीचरने सुसज्ज असतील तसेच फोनचा कॅमेरा 3डी सेंसिंग टेक्नॉलॉजी वर चालेल. रिपोर्टनुसार सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनसाठी फिंगरप्रिंट सेंसिंग टेक्नोलॉजी क्वालकॉम आणि सिनेप्टिक्स कंपनी द्वारा बनवली जात आहे तर फोनच्या 3डी कॅमेऱ्याचे काम इजराईलची कंपनी मँटिस विजन करत आहे.
सध्या सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि एस10+ स्मार्टफोन बद्दल अनेक बातम्या येणे बाकी आहे. पण बोलले जात आहे कि सॅमसंग आपला हा स्मार्टफोन खास आणि एडवांस टेक्नॉलॉजीसह बाजारात आणेल, जो फक्त ऍप्पल आईफोन 10 च्या फीचर्सला मात देणार नसून स्मार्टफोन्सच्या दुनियेला नवीन वळण देईल.
