Tecno ने अलीकडेच भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन Tecno Spark Go Plus लॉन्च केला होता जो 6,299 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. या फोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच, 4000एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेरा आहे. कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन घेऊन येणारी Tecno आता भारतात लवकरच आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे जो क्वॉड रियर कॅमेऱ्यासह येईल. 91मोबाईल्सला Tecno च्या या आगामी स्मार्टफोनचा एक्सक्लूसिव फोटो मिळाला आहे, ज्यात फोनचा बॅक पॅनल स्पष्ट दिसतो.
91मोबाईल्सला माहिती मिळाली आहे कि Tecno लवकरच भारतीय बाजारात आपला क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे आणि या स्मार्टफोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाईल. आम्हाला या फोनच्या नावाची माहिती मिळाली नाही पण इतके नक्की कि हा डिवाईस ‘Tecno Camon’ सीरीज अंतर्गत येईल. फोन बाजारात येण्याआधी आम्हाला या फोनचा फोटो पण मिळाला आहे ज्यावरून फोनच्या डिजाईनचा खुलासा पण झाला आहे.
असा असेल लुक
आम्हाला मिळलेल्या फोटो मध्ये फोनचा बॅक पॅनल दिसत आहे. फोनच्या रियर पॅनल वर उजिवाकडे कॅमेरा सेटअप आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये उजवीकडे चार कॅमेरा सेंसर आहेत. या कॅमेरा सेंसर्सच्या डावीकडे वर्टिकल शेप मध्ये क्वॉड एलईडी लाईट देण्यात आली आहे. फ्लॅश लाईटच्या खाली ‘Camon 48M AI Quad Cam’ लिहिण्यात आले आहे. हा टेक्स्ट पण सिद्ध करतो कि टेक्नोचा हा आगामी स्मार्टफोन 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल.
या आगामी Tecno Camon फोनच्या बॅक पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोनच्या उजव्या साईड पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण पण स्पष्ट दिसत आहे. तसेच फोनच्या डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. विशेष म्हणजे Tecno ब्रँड भारतात आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन पण आणणार आहे. पण अजूनतरी समोर आलेला 48एमपी क्चॉड रियर कॅमेरा असलेला फोनच पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला डिवाईस असेल कि नाही याची खात्री झालेली नाही.
Tecno Camon 12 Air
Tecno Camon 12 Air या सीरीजचा लेटेस्ट फोन अशे जो पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या डिस्प्लेला डॉट-इन डिस्प्लेचे नाव दिले आहे. Tecno Camon 12 Air मध्ये 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.55 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित असेल जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये पावरवीआर जीई8320 जीपीयू आहे.
Tecno Camon 12 Air बद्दल सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस भारतात 3 जीबी रॅम वर लॉन्च होईल. या फोन मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 500 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Tecno Camon 12 Air एआई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल.
त्याचप्रमाणे रियर कॅमेरा सेटअप मध्ये 120डिग्री क्षमता असलेली 5 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळेल. सेल्फीसाठी Tecno Camon 12 Air मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच पावर बॅकअपसाठी Tecno Camon 12 Air मध्ये 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.
