हायब्रीड सायकल तुम्हाला इलेक्ट्रिक पावर देखील देतात आणि पेडल करून देखील तुम्ही प्रवास करू शकता. आणि बाजारात hybrid electric cycle खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक सायकल (electric cycle) विकत घेण्याचा विचार करत असाल तर Ninety-One Enigma R7 हायब्रीड इलेक्ट्रिक सायकल एक शानदार पर्याय ठरू शकते. यात एनिग्मा मल्टी-स्पीड गियर सिस्टम देण्यात आली आहे. Ninety-One सायकलनं भारतात खूप कमी किंमतीत हायब्रीड ई-बाईक सादर केली आहे.
Enigma R7 A 7-Speed Hybrid Electric Cycle ची किंमत
अॅमेझॉनवर ही हायब्रीड इलेक्ट्रिक सायकल 36,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आली आहे. सध्या या सायकलची विक्री 22 डिस्काउंटनंतर ही सायकल 28,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाली आहे. म्हणजे या सायकलवर तुम्ही 800 रुपयांची बचत करू शकता. तसेच ईएमआयचा पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्याची सुरुवात 1,365 रुपयांपासून होते.
डिजाईन
या सायकलची डिजाइन स्पेक्टर 700C सारखी आहे आणि यात 18 इंच फ्रेम डिजाइन देण्यात आली आहे जी हाय-टेन्साइल कार्बन स्टीलपासून बनवण्यात आली आहे. या मजबूत आणि टिकाऊ फ्रेमवर कंपनीच्या वेबसाईटवर रेजिस्ट्रेशन केल्यावर आयुष्यभराची वॉरंटी देत आहे. अपेक्षेप्रमाणे ही स्टील फ्रेम हलकी आहे आणि हिचे वजन जवळपास 22 किलोग्राम आहे ज्यात बॅटरीचा देखील समावेश आहे.
ही सायकल 100 किलोग्रामपर्यंत वजन सहन करू शकते. बाईकमध्ये 10 इंचाची सीट पोस्ट आहे आणि ही 5′5″ ते 5’10” उंची असलेल्या रायडर्ससाठी उत्तम आहे. Enigma R7 250w IP65 BLDC रियर हब मोटरवर चालते आणि यात खेचण्याची चांगली शक्ती आहे, कारण ही 40nm पर्यंत टॉर्क उत्पन्न करू शकते. सरकारी नियमांनुसार टॉप स्पीड ताशी 25 km पर्यंत मर्यादित आहे. कंपनीच्या मते ही सायकल फक्त 7 पैसे प्रति km इतका खर्च देते.
40km पर्यंतची रेंज
बाईक पॅनासोनिकच्या 36v/6.36Ah नॉन-रिमूवेबल लिथियम-आयन बॅटरीसह येते, जी 2000 चार्जिंग सायकल देऊ शकते. 2A चार्जरच्या मदतीनं ही बॅटरी फक्त 3 ते 4 तासांमध्ये चार्ज होते. सिंगल चार्जवर तुम्ही थ्रॉटल मोडसह तुम्ही जवळपास 40km चा प्रवास करू शतक. तसेच पेडल-असिस्ट मोडवर तुम्हाला जवळपास 30 ते 35km ची रेंज मिळेल. कंपनीनं हँडलबार वर IP66 रेटिंगसह LED डिस्प्ले दिला आहे. या हायब्रीड बाईकमध्ये 700c चाकांसह अँटी-स्किड हाय-ट्रॅक्शन राल्सन टायर्स देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये कोणतेही सस्पेंशन देण्यात आले नाही.
7-स्पीड गियर असलेली इलेक्ट्रिक सायकल
Enigma R7 एक 7-स्पीड गियर असलेली इलेक्ट्रिक सायकल आहे जी मागे Tourney रियर डिरेलियर आणि SIS इंडेक्स शिफ्टरसह येते. बाईकमध्ये 160mm ड्यूल मेकॅनिकल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. हे इलेक्ट्रिक ब्रेक आहेत म्हणजे इलेक्ट्रिक कट-ऑफ सिस्टमसह येतात. बाईक स्टार्ट करण्यासाठी बाईकमध्ये इग्निशन देखील आहे. परंतु बाईकमध्ये कोणतीही हेडलाईट, हॉर्न किंवा मडगार्ड नाही.
