Home बातम्या सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि यूनिक डिजाइन सह येईल Nokia 10 PureView

सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि यूनिक डिजाइन सह येईल Nokia 10 PureView

नोकियाचे स्मार्टफोन बनवणारी कंपनी HMD Global च्या अपकमिंग फ्लॅगशिप फोन बद्दल बातमी समोर आली होती. यात सांगण्यात आले होते कि कंपनी Nokia 10 लॉन्च करण्याची तयारी करत आहे. तसेच आता Nokia 10 PureView (संभावित नाव) च्या ऑफिशियल घोषणेच्या आधी लुक आणि डिजाइन सोबतच प्रोसेसरची माहिती समोर आली आहे. एका लीक मध्ये नोकियाच्या या अपकमिंग स्मार्टफोनची झलक दिसली आहे, ज्यावरून समजले आहे कि या फोन मध्ये पावरफुल आणि लेटेस्ट Snapdragon 875 SoC प्रोसेसर असेल.

NokiaPowerUser च्या रिपोर्टनुसार याची फ्रेम स्टेनलेस स्टीलचा असेल. इतकेच नव्हे तर सफायर ग्लास डिस्प्ले असेलल्या या फोन मध्ये मल्टी कॅमेरा सेटअप असेल, जो Zeiss ऑप्टिक्स सह येईल. बोलले जात आहे कि हा कंपनीच्या Nokia 9.3 PureView चा सक्सेसर असू शकतो. Nokia 9.3 PureView पण आतापर्यंत लॉन्च झाला नाही आणि याची अनेक दिवसांपासून वाट बघितली जात आहे.

नोकिया 10 प्योरव्यू च्या लॉन्च डेटची घोषणा झाली नाही. पण बोलले जात आहे कि हा पुढल्या वर्षी सादर केला जाऊ शकतो. हा पुढल्या वर्षी जून पर्यंत लॉन्च केला जाऊ शकतो. नोकियाच्या या फोनच्या जीवावर सॅमसंग आणि हुवावेच्या प्रीमियम स्मार्टफोनना टक्कर देईल.

गूगल पिक्सल सारखा असेल Nokia 10

समोर आलेल्या या डॉक्यूमेंट मध्ये माहिती मिळाली आहे कि नोकिया कंपनी गूगल सह पार्टनरशिप करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे आशा आहे नोकिया 10 स्मार्टफोन गूगल पिक्सल सारखा असू शकतो. पण याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा : Nokia ने आणला अजून एक स्वस्त 4G स्मार्टफोन, किंमत फक्त 6,500 रुपयांच्या आसपास

नोकिया 6.3 आणि नोकिया 7.3 5G होऊ शकतात लॉन्च

कंपनी यावर्षीच्या शेवटपर्यंत नोकिया 6.3 आणि नोकिया 7.3 5G पण लॉन्च करू शकते. तसेच कंपनी नोकिया 9.3 फ्लॅगशिप स्मार्टफोन पण सादर करू शकते. लीक रिपोर्ट्सनुसार या फोन मध्ये कंपनी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि पेंटा-लेंस कॅमेरा सेटअप सारखे फीचर्स देऊ शकते.