काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि टेक कंपनी नोकिया यावर्षी तिसऱ्या तिमाहीत आपले तीन नवीन स्मार्टफोन Nokia 6.3, Nokia 7.3 आणि Nokia 9.3 PureView 5G लॉन्च करू शकते. हे तिन्ही डिवाईसेज बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स पण समोर येत आहेत ज्यात फोनच्या फोटोज आणि स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख झाला आहे. नोकियाने अजूनतरी या तिन्ही एंडरॉयड स्मार्टफोन्सच्या लॉन्चची कोणतीही माहिती दिलेली नाही. पण दुसरीकडे फीचर फोन वापरणाऱ्या यूजर्ससाठी कंपनीने दोन नवीन मोबाईल Nokia 125 आणि Nokia 150 (2020) टेक मंचावर सादर केले आहेत.
Nokia 125
नोकिया 125 पाहता हा फोन 2.4 इंचाच्या क्यूवीजीए कलर डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या खाली फिजिकल कीपॅड आहे. या फोनचे वजन 91.3 ग्राम आहे तसेच डायमेंशन 132×50.5×15एमएम आहे. हि फीचर फोन सीरीज 30+ सॉफ्टवेयर वर चालते. कंपनीने या फोन मध्ये 4एमबी रॅम दिला आहे. तेवढीच इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी कॉन्टेक्ट सोबतच मीडिया फाईल सेव करू शकते.
Nokia 125 मध्ये वीजीआर कॅमेरा देण्यात आलेला आहे ज्या सोबत फ्लॅश लाईट पण आहे. या फोन मध्ये नोकियाचा आइकॉनिक स्नेक गेम प्री इंस्टाल मिळेल. हा एक डुअल सिम फोन आहे म्हणजे एक साथ दोन नंबर्स वापरू शकतो. Nokia 125 1020एमएएच च्या बॅटरी वर लॉन्च केला गेला आहे जो कंपनीच्या दाव्यानुसार 19.4 तास टॉकटाईम तसेच 23.4 दिवसांचा स्टँडबाय टाईम देऊ शकतो. फोन मध्ये 3.5एमएम जॅक आणि एफएम रेडियो सारखे फीचर्स आहेत. इंटरनेशनल मार्केट मध्ये नोकिया 125 charcoal black आणि powder white कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.
Nokia 150 (2020)
नोकिया 150 साल 2016 मध्ये लॉन्च झालेल्या फीचर फोनचा अपग्रेडेड वर्जन आहे. सविस्तर पाहता हा मोबाईल फोन पण 2.4 इंचाच्या क्यूवीजीए कलर डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे ज्याच्या खाली फिजिकल कीपॅड आहे. या फोनचे वजन 90.54 ग्राम आहे तसेच डायमेंशन 132×50.5×15एमएम चे आहे. हा फीचर फोन पण सीरीज 30+ सॉफ्टवेयर वर चालतो. Nokia 150 (2020) मध्ये ब्लूटूथ 3.0 पण देण्यात आली आहे.
Nokia 150 (2020) मध्ये पण 4एमबी रॅम सोबतच तेवढीच इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची मेमरी कार्डच्या माध्यमातून 32 जीबी पर्यंत वाढवता येते. नवीन नोकिया 150 एक डुअल सिम फोन आहे तसेच या फोन मध्ये इंटरटेनमेंटसाठी गेम्स सोबतच एमपी3 प्लेयर पण देण्यात आलेला आहे. Nokia 150 (2020) 1020एमएएच च्या बॅटरी वर लॉन्च केला गेला आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 19.4 तासांचा टॉकटाईम देऊ शकते. हा फोन Black, Cyan आणि Red कलर मध्ये लॉन्च झाला आहे.
हे दोन्ही फोन निवडक बाजारांमध्ये सेलसाठी उपलब्ध होतील. किंमत पाहता Nokia 150 (2020) ग्लोबल मार्केट मध्ये जवळपास 2,200 रुपयांमध्ये किंमतीत लॉन्च केला गेला आहे तर Nokia 125 चे मूल्य इंडियन करंसीनुसार जवळपास 1,800 रुपये आहे.
