Nokia 2.3 काही दिवसांपूर्वी एचएमडी ग्लोबलने कायरो मध्ये लॉन्च केला होता. आता या फोनचा टीजर नोकिया मोबाईल इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून जारी केला गेला आहे. टीजर समोर आल्यामुळे आशा वाढल्या आहेत कि कंपनी हा फोन भारतात लवकरच लॉन्च करू शकते. फोन गेल्या आठवड्यात 109 यूरो (जवळपास 8,600 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला होता.
एचएमडी ग्लोबलने Nokia 2.3 डिसेंबरच्या मध्यात ग्लोबल मार्केट मध्ये उपलब्ध करणार असे सांगितले होते. कदाचित तेव्हाच भारतात हा डिवाइस लॉन्च केला जाईल. कंपनीने नुकताच भारतात 55 इंचाचा 4K स्मार्ट टीवी लॉन्च केला आहे, सोबत या डिवाइसच्या लॉन्चची बातमी होती. पण असे नाही झाले.
Chahe din ho ya raat, aapke uninterrupted baaton ki guarantee hamaari. Aa raha hai #BadeKaamKaPhone. Stay tuned. pic.twitter.com/XprA7OTT1Z
— Nokia Mobile India (@NokiamobileIN) December 11, 2019
नोकिया मोबाईल इंडियाच्या ट्विटर अकाउंट वर एक नाही दोन वीडियो टीजर आले आहेत. आशा व्यक्त केली जात आहे कि हा फोन नोकिया 2.3 असेल. पहिल्या टीजर मध्ये शानदार बॅटरी लाइफचा उल्लेख आहे. तर दुसऱ्या टीजर मध्ये फोनच्या कॅमेरा परफॉर्मेंसबद्दल दावा केला गेला आहे.
Nokia 2.3 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia 2.3 मध्ये कंपनीने 6.2-इंच “एडवांस्ड” इन-सेल डिस्प्ले HD+ रेजोल्यूशन आणि 19:9 आस्पेक्ट रेश्यो देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000mAh ची बॅटरी आहे जी 2 दिवस चालेल. त्याचबरोबर फोन मीडियाटेक एंट्री-लेवल Helio A22 चिपसेट सह 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज सह येतो. फोनची स्टोरेज ग्राहक माइक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवू शकतात.
Aapke khoobsurat moments ko yaadgaar banane ki guarantee humaari. Aa raha hai #BadeKaamKaPhone. Stay tuned. pic.twitter.com/Iqpv32xTR4
— Nokia Mobile India (@NokiamobileIN) December 12, 2019
फोटोग्राफी साठी Nokia 2.3 मध्ये डुअल रियर कॅमेरा सपोर्ट देण्यात आला आहे. यात 13-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सल सेकेंडरी सेंसर एलईडी फ्लॅश सह आहे. फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी 5- मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
सॉफ्टवेयर पाहता Nokia 2.3 एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो आगामी काळात एंडरॉयड Android 10 वर अपडेट होईल. तसेच फोन मध्ये गूगल असिस्टेंट साठी वेगळे बटण आणि फेस अनलॉक आहे.
