Nokia ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन लो बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस Nokia 2.4 स्मार्टफोन अधिकृतपणे जगासमोर ठेवला आहे. हा स्मार्टफोन फक्त 10,399 रुपयांमध्ये भारतीय बाजारात लॉन्च झाला आहे जो आज पासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. लो बजेट मध्ये आलेल्या Nokia 2.4 स्मार्टफोनमुळे Xiaomi – Realme सारख्या चीनी कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न आहे.
Nokia 2.4
नोकिया 2.4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. यावर Nokia ची ब्रँडिंग आहे. तर स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे.
Nokia 2.4 कंपनीने अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. कंपनीच्या वेबसाइट वर नोकिया 2.4 64 जीबी स्टोरेज सह पण दाखवण्यात आला आहे. आशा आहे कि हा वेरिएंट आगामी काही दिवसांत विक्रीसाठी उपलब्ध होईल.
हे देखील वाचा : Nokia एक साथ घेऊन येत अनेक स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती
फोटोग्राफीसाठी नोकिया 2.4 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मधोमध शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची प्राइमरी 5पी लेंस देण्यात आली आहे त्यासोबतच 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या 3पी फ्रंट लेंसला सपोर्ट करतो.
फोटो मध्ये नोकिया 2.4 चा रियर पॅनल वर थोडा रग्ड वाटत आहे जो कदाचित ऑरा डिजाईन वर बनलेला असू शकतो. रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Nokia 2.3 मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर नव्हता, तो फोन फक्त फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करत होता. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर अजून एक बटन आहे. आशा आहे कि हा गूगल असिस्टेंट बटन असू शकतो.
हे देखील वाचा : दमदार फीचर्स सह पुन्हा आले Nokia 6300 4G आणि Nokia 8000 4G, करतील का मार्केट मध्ये धमाल
Nokia 2.4 रियर डुअल सिम फोन आहे ज्यात दोन नॅनो सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड एकसाथ वापरता येतो. हा फोन 3.5एमएम जॅक, एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. कंपनीने या फोन मध्ये गूगल असिस्टेंट का शार्टकट बटन पण देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी Nokia 2.4 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 2.4 कंपनीने 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आला आहे. हा फोन ओटीजी फीचर सह येतो ज्यामुळे रिवर्स चार्ज पण करता येते.
