Home बातम्या Nokia ने आणला अजून एक स्वस्त 4G स्मार्टफोन, किंमत फक्त 6,500 रुपयांच्या आसपास

Nokia ने आणला अजून एक स्वस्त 4G स्मार्टफोन, किंमत फक्त 6,500 रुपयांच्या आसपास

Nokia ने काल भारतात आपले दोन 4जी फीचर फोन लॉन्च केले आहेत ज्यात 2,949 रुपयांच्या Nokia 215 4G आणि 3,499 रुपयांच्या Nokia 225 4G फोनचा समावेश आहे. हे दोन्ही मोबाईल फोन सध्या चीन आणि भारतातच लॉन्च केले गेले आहेत. जगातील दोन मोठ्या मोबाईल बाजारांत फीचर फोन लॉन्च केल्यानंतर आता नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असलेल्या टेक कंपनी HMD Global ने अमेरिकन मार्केट मध्ये पण आपला एक नवीन एंट्री लेवल स्मार्टफोन Nokia 2 V Tella नावाने सादर केला आहे.

एचएमडी ग्लोबल द्वारे लॉन्च केला गेलेला हा फोन एक लो बजेट डिवाईस आहे ज्याची बेस किंमत फक्त $89 म्हणजे भारतीय करंसीनुसार 6,500 रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जात आहे. Nokia 2 V Tella अमेरिकेत वेरिजॉन शॉपिंग साइट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि वरील किंमत प्रीपेड कस्टमर्ससाठी असेल. तसेच रिटेल स्टोर्स वर नोकिया 2 वी टेला बंडल पॅक मध्ये $168 म्हणजे जवळपास 12,000 रुपयांमध्ये विकत घेता येईल. नोकिया हा फोन भारतात लॉन्च करेल कि नाही हे अजून समजले नाही.

Nokia 2 V Tella

नोकियाच्या या नवीन फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असेलेल्या 5.45 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Nokia 2 V Tella मध्ये कोणतीही नॉच दिली नाही. फोनच्या स्क्रीनच्या वरच्या आणि खालच्या भागावर जाड बेजल्स देण्यात आले आहेत तसेच दोन्ही बाजूंनी डिस्प्ले बॉडी पार्टला जोडला आहे. वरच्या बेजल वर स्पीकर आणि सेल्फी कॅमेऱ्यासह Nokia चा लोगो आहे.

हे देखील वाचा : नोकियाने दिला जियोला झटका, JioPhone च्या समोर लॉन्च केले दोन स्वस्त 4G फीचर फोन Nokia 215 आणि Nokia 225

Nokia 2 V Tella अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो ‘गो एडिशन’ सह येतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.0 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बना मीडियाटेकचा ए22 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन पावरवीआर जीई8320 जीपीयूला सपोर्ट करतो. अमेरिकन बाजारात नोकिया 2 वी टेला 2जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी नोकियाचा हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 8 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 3.5एमएम जॅक सोबतच अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. Nokia 2 V Tella च्या साईड पॅनल वर शार्टकट गूगल असिस्टंट बटन देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. यूएस मध्ये हा फोन ब्लू कलर मध्ये उपलब्ध होईल.