Home बातम्या फोनच्या मागेच फिट होतात TWS Earbuds; हटके Nokia 5710 XpressAudio देतो 31 दिवसांचा बॅकअप

फोनच्या मागेच फिट होतात TWS Earbuds; हटके Nokia 5710 XpressAudio देतो 31 दिवसांचा बॅकअप

Nokia च्या फोन्सचा वापर आता जरी कमी झाला असला तरी हे नाव मात्र सर्वांना माहित आहे. मोबाइल फोन्सच्या सुरुवातीपासून नोकिया ब्रँड बाजारात उपलब्ध आहे. Feature Phones पासून सुरुवात करणाऱ्या नोकियाचे Smartphones आता देखील हिट होत आहेत. आपल्या फॅन्ससाठी कंपनी जुने नोकिया फोन्स नव्या रूपात सादर करत आहेत. या अंतर्गत आता Nokia 5710 XpressAudio लाँच झाला आहे जो built-in TWS earbuds सह येतो.

Nokia 5710 XpressAudio ची सर्वात जास्त चर्चा फोनच्या डिजाईन बद्दल होत आहे. हा फोन अशाप्रकारे बनवण्यात आला आहे की यात TWS म्हणजे ट्रूली वायरलेस इअरबड्स फिट होतात. हे टीडब्ल्यूएस नोकिया 5710 एक्सप्रेस ऑडियो फोनच्या रियर पॅनलवर फिट करण्यात आले आहेत. मोबाइलचा बॅक पॅनल अशाप्रकारे बनवण्यात आला की याच्या वरच्या भागात दोन्ही इअरबड्स आत फिट होतात तसेच बाहेरून दिसत नाहीत.

Nokia 5710 XpressAudio ची डिजाईन

याच्या डिजाइनवर नजर टाकल्यास फोनच्या बॅक पॅनलवर स्लाइडर देण्यात आला आहे. Wireless Earbuds या स्लाइडरच्या मागे फिट होतात. स्लाइडर खाली सरकवून इअरबड्स बाहेर काढता येतात. हा स्लाइडर बंद असताना त्याखाली रियर कॅमेरा सेन्सर आणि फ्लॅश लाईट आहे.

Nokia 5710 XpressAudio च्या नावावरून समजलं असेल की हा मोबाइल फोन खासकरून संगीतप्रेमींसाठी सादर करण्यात आला आहे. या फोनच्या दोन्ही साईड पॅनलवर म्यूजिक कंट्रोलर बटन आहेत. उजव्या बाजूला प्रीवियस, नेक्स्ट व प्ले/पॉज बटन आहे तर डावीकडे वॉल्यूम अप आणि डाउन बटन देण्यात आलं आहे. या कंट्रोल्समुळे फोनकडे न बघता शानदार गाण्यांचा आनंद घेता येतो.

Nokia 5710 XpressAudio चे फीचर्स

नोकिया 5710 एक्सप्रेस ऑडियामध्ये देण्यात आलेले वायरलेस इअरबड्स वेगळे चार्ज करण्याची गरज नाही. फोनमध्ये ठेवल्यावर ईयरबड आपोआप चार्ज होत राहतात. तसेच या फोनमध्ये रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे जी 31 दिवस म्हणजे संपूर्ण एक महिन्याचा स्टँडबाय टाईम देते.

Nokia 5710 XpressAudio चे अन्य फीचर्स पाहता हा मोबाइल 4जी वोएलटीई व 3जीला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 2.4 इंचाचा क्यूवीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच फोटोग्राफीसाठी 0.3 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. ऑडियोसाठी हा फोन एफएम रेडियो व एमपी3 प्लेयरला देखील सपोर्ट करतो. हा फोन रेड अँड व्हाईट तसेच रेड अँड ब्लॅक कलरमध्ये सादर झाला आहे.

हा नोकिया फोन 48एमबी रॅमसह येतो जो 128एमबी इंटरनल स्टोरेज तसेच 32जीबी मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो. Nokia 5710 XpressAudio मध्ये Unisoc T107 चिपसेट देण्यात आला आहे जो S30+ ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. फोनमध्ये ब्लूटूथ 5.0 सोबतच Snake व Tetris सारखे अनेक गेम्स मिळतात. नोकिया आपला हा फोन ऑक्टोबरमध्ये भारतात लाँच करू शकते.