Home बातम्या ऑफलाइन स्टोर वर उपलब्ध झाला नोकिया 6.1 प्लस, यात आहे नॉच स्क्रीन आणि डुअल कॅमेरा

ऑफलाइन स्टोर वर उपलब्ध झाला नोकिया 6.1 प्लस, यात आहे नॉच स्क्रीन आणि डुअल कॅमेरा

गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये नोकिया ने 6.1 प्लस मॉडेल भारतात सादर केला होता. त्यावेळी हा फोन फक्त ऑनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर उपलब्ध होता. परंतु नोकियाचा हा फोन तुम्ही ऑफलाइन स्टोर मधून पण विकत घेऊ शकता. आजपासून हा फोन भारतात ऑफलाइन स्टोर वर आला आहे जिथे याची किंमत 15,499 रुपये आहे. कंपनीने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही पण 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल स्टोर कडून हि बातमी मिळाली आहे.

नोकिया 6.1 प्लस चे स्पेसिफिकेशन
फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ ​डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 × 2280 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. स्क्रॅच पासून वाचण्यासाठी नोकिया 6.1 प्लस 2.5डी गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे.

नोकिया चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी वर अपडेट होईल. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट सादर करण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो जे बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी नोकिया 6.1 प्लस मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. नोकिया 6.1 प्लस च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. नोकिया 6.1 प्लस मध्ये 4जी वोएलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.