नोकियाचे स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD Global बद्दल अनेक दिवसांपासून बातमी समोर येत होती कि कंपनी लवकरच दोन क्लासिक स्मार्टफोन्स नवीन अवतारात लॉन्च करणार आहे. आता कंपनीने सर्व बातम्यांवर पूर्ण विराम देत Nokia 6300 4G आणि Nokia 8000 4G अधिकृतपणे ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केले आहेत. या दोन्ही फीचर मध्ये युजर्सना व्हाट्सऍप, फेसबुक आणि गुगल असिस्टंट सारखे फीचर्स दिले जात आहेत. इतकेच नव्हे तर जियोफोन प्रमाणेच हा फोन्स KaiOS वर आधारित आहेत आणि हे Snapdragon 210 प्रोसेसर वर सादर केले गेले आहेत.
डिजाइन आणि कलर
Nokia 6300 4G पॉलीकार्बोनेट बॉडी वर बनला आहे. तसेच Nokia 8000 4G ग्लास शेल सह मेटल क्रोम मिडफ्रेम फिनिश वर बनला आहे, या फोनचा लुक खूप आकर्षक आहे. दोन्ही डिवाइस फीचर फोन आहेत. तसेच नोकिया 6300 4G फोन सियान ग्रीन, लाइट चारकोल आणि पाउडर व्हाइट या कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. तर नोकिया 8000 4G ओनिक्स, ओपल, सिट्रिन आणि टोपाज कलर मध्ये आला आहे.
फेसबुक, व्हाट्सऍप आणि गुगल असिस्टेंट
Nokia 6300 4G एक फीचर फोन आहे पण यात तुम्ही यूट्यूब व्हिडीओ बघू शकता, सोबतच हॉटस्पॉटच्या माध्यमातून इंटरनेट शेयर पण करू शकता. इतकेच नव्हे तर यात Google Assistant सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजे तुम्ही Ok Google बोलून फोन मध्ये काहीही सर्च करू शकता. Nokia 8000 4G मध्ये पण खास फीचर्स म्हणून WhatsApp, Facebook आणि Google Assistant सपोर्ट देण्यात आला आहे.
Nokia 6300 4G चे स्पेसिफिकेशन
Nokia 6300 4G मध्ये 2.4 इंचाचा QVGA IPA डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 512MB रॅम आणि 4GB स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डचा वापर करून 32GB पर्यंत वाढवता येते. तसेच फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 210 प्रोसेसर वर चालतो आणि KaiOS वर आधारित आहे. या डिवाइस मध्ये पावर बॅकअपसाठी 1500mAh ची बॅटरी आणि फ्लॅश सह वीजीए रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
Nokia 8000 4G चे स्पेसिफिकेशन्स
Nokia 8000 4G मध्ये 2.8 इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा डिवाइस पण KaiOS वर आधारित आहे आणि स्नॅपड्रॅगॉन 210 प्रोसेसर सह येतो. फोन मध्ये 512MB रॅम आणि 4GB स्टोरेज देण्यात आली आहे, ती 32GB पर्यंत वाढवता येते. फोन मध्ये युजर्सना फ्लॅश सह 2MP चा रियर कॅमेरा मिळेल. पावर बॅकअपसाठी 1500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत
हे दोन्ही फीचर फोन ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केले गेले आहेत. यांची किंमत पाहता Nokia 6300 4G 49 EUR (जवळपास 4,300 रुपये) मध्ये विकत घेता येईल आहे. हा फोन सियान ग्रीन, लाइट चारकोल आणि पाउडर व्हाइट कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होईल. तर Nokia 8000 4G ची किंमत 79 EUR ( जवळपास 6,900 रुपये) आहे. युजर्स हा ओनिक्स, ओपल, सिट्रिन आणि टोपाज कलर वेरिएंट मध्ये विकत घेऊ शकतात.
