Home बातम्या नवीन अवतारात येत आहे Nokia 6300 आणि नोकिया 8000, पुन्हा येतील जुने दिवस

नवीन अवतारात येत आहे Nokia 6300 आणि नोकिया 8000, पुन्हा येतील जुने दिवस

HMD Global नोकियाचे क्लासिक स्मार्टफोन्स नवीन अवतारात लॉन्च करत असते. नवीन अपग्रेड सह येणारे हे जुने फोन्स ग्राहकांना पण आवडतात आणि हेच चालू ठेवत आता कंपनी दोन जुने मोबाईल फोन- Nokia 6300 आणि Nokia 8000 लॉन्च करण्याची तयारी करत आहे. बोलले जात आहे कि कंपनी हे दोन्ही फोन्स 4G सपोर्ट आणि आजच्या नवीन फीचर्स सह लॉन्च करू शकते. नोकिया 8000 4G आणि Nokia 6300 4G फीचर फोन Telia carrier’s लिस्ट मध्ये दिसले आहेत जिथे हे फोन वाय-फाई कॉलिंग सपोर्ट सह दिसले आहेत.

यावरून समजते कि एचएमडी ग्लोबल फोन पुन्हा सादर करण्याचा विचार करत आहे. नोकिया क्लासिक्स लाइनअपचा भाग म्हणून हे फोन्स पुन्हा आणू शकते ज्यात आधीच नोकिया 3310 (2017), नोकिया 8110 4 जी, नोकिया 2720 फ्लिप आणि नोकिया 5310 चा समावेश आहे.

हे देखील वाचा : Nokia ने आणला अजून एक स्वस्त 4G स्मार्टफोन, किंमत फक्त 6,500 रुपयांच्या आसपास

लक्षात असू दे कि नोकिया 6300 ची घोषणा साल 2006 मध्ये करण्यात आली होती, तेव्हा हे फोन 2MP कॅमेरा आणि S40 OS वर चालत होते. नोकिया 8000 4G आणि Nokia 6300 4G स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती मिळाली नाही, पण आशा आहे कि कंपनी लवकरच या फोन्स बाबत माहिती देईल.

नोकिया 8000 पाहता हा फोन 90 च्या दशकातील नोकियाचा प्रीमियम सीरीजचा डिवाइस होता. या फोन मध्ये सफायर कोटेड ग्लास कवरिंग डिस्प्ले, कीपॅडसाठी स्लाइड आउट कवर आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा होता.

हे देखील वाचा : JioPhone ला टक्कर देण्यासाठी नोकियाने आणले दोन स्वस्त 4G फीचर फोन, Nokia 215 आणि Nokia 225 झाले लॉन्च

अलीकडेच एक बातमी समोर आली होती कि HMD Global आपल्या नवीन फोन Nokia 10 PureView वर पण काम करत आहे. NokiaPowerUser च्या रिपोर्ट मध्ये समोर आले होते कि फ्रेम स्टेनलेस स्टीलची असेल. इतकेच नव्हे तर सॅफायर ग्लास डिस्प्ले असलेल्या या फोन मध्ये मल्टी कॅमेरा सेटअप असेल, जो Zeiss ऑप्टिक्स सह येईल. बोलले जात आहे कि हा कंपनीच्या Nokia 9.3 PureView चा सक्सेसर असू शकतो. पण Nokia 9.3 PureView अजूनही लॉन्च झाला नाही आणि याची अनेक दिवसांपासून वाट बघितली जात आहे.