Home बातम्या एक्सक्लूसिव : नोकिया 8110 4जी फीचर फोन येत्या महिन्यात भारतता होईल लॉन्च

एक्सक्लूसिव : नोकिया 8110 4जी फीचर फोन येत्या महिन्यात भारतता होईल लॉन्च

नोकिया ने कालच भारतीय टेक बाजारात आपले दोन नॉच डिस्प्ले वाले स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनी ने नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस देशात लॉन्च केले आहेत. या दोन शानदार स्मार्टफोन्सच्या लॉन्च सोबतच बातमी आली आहे की नोकिया वर मालकी हक्क असणारी एचएमडी ग्लोबल आता लवकरच इंडियन मार्केट मध्ये नोकिया 8110 4जी फीचर फोन लॉन्च करणार आहे. ही माहिती इतर कोणी दिली नसून खुद्द कंपनी ने चीफ प्रोडक्ट आॅ​फिसर जुहो सरविकास ने 91मोबाईल्सच्या टीम ला दिली आहे.

नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस च्या लॉन्च ईवेंट मध्ये उपस्थित एचएमडी ग्लोबल चे चीफ प्रोडक्ट आॅफिसर जुहो सरविकास यांना 91मोबाईल्स ने नोकिया 8110 4जी फीचर फोन बद्दल विचारल्यावर जुहो ने होकर देत कंपनी हा फोन इंडिया मध्ये लॉन्च करण्याची तयारी करत आहे. जुहो यांनी नोकिया 8110 4जी कोणतीही फिक्स लॉन्च डेट सांगितली नाही पण एवढे मात्र नक्की सांगितले आहे की हा फोन सप्टेंबर महिन्यात लवकरच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात येईल.

नोकिया 8110 4जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन मध्ये आल्फान्यूमेरिक कीपॅड देण्यात आला जो स्लाइडर कवर खाली लपलेला आहे. पॉलीकार्बोनेट ने बनलेली याची बॉडी दिसायला खुप आकर्षक आहे आणि मागचा पॅनल खुप कर्व्ड आहे. फोन मध्ये 2.4 इंचाचा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यामुळे अॅप्स वापर आणि वीडियोज बघता येतील. हा फोन पिवळ्या आणि लाल सहित अनेक आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

हा फोन स्मार्ट फीचर ओएस आधारित आहे जो 1.1गीगाहर्ट्ज़ क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 205 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये 512एमबी रॅम देण्यात आला आहे तसेच यात मेमरी कार्ड सपोर्ट सोबत 4जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा फोन 2 मेगापिक्सल च्या कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. तसेच डाटा व कनेक्टिविटी साठी यात 4जी सोबत वाईफाई, ब्लूटूथ आणि यूएसबी 2.0 पोर्ट आहे.

नोकिया 8110 4जी फीचर फोन मध्ये गूगल अॅप्स सोबतच फेसबुक, आणि ट्विटर इत्यादी पण वापरता येतील. 4जी आधारित या फोन मध्ये अॅप स्टोर वरून अॅप्स डाउनलोड करता येतील आणि नोकिया चा बहुचर्चित स्नेक गेम पण यात आहे. तसेच 3.5एमएम आॅडियो जॅक सोबत हा फोन एफएम रेडियो ला पण सपोर्ट करतो. नोकिया 8110 4जी मध्ये पावर बॅकअप साठी 1,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया 8110 4जी फीचर फोनची अंर्तराष्ट्रीय किंमत 79 यूरो आहे जी भारतीय करन्सी नुसार जवळपास 6,000 रुपये आहे. फोन लॉन्च च्या निश्चित तारीख आणि याचे स्पेसिफिकेशन्स लवकरच तुमच्या पर्यंत पोहोचवले जातील. कदाचित नोकिया हा फोन अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल करेल.