Home बातम्या लॉन्च झाला नोकियाचा सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन Nokia C1 Plus, बघा याचे शानदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

लॉन्च झाला नोकियाचा सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन Nokia C1 Plus, बघा याचे शानदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Nokia ब्रँडचे मालकी हक्क असलेल्या टेक कंपनी HMD Global ने मोबाईल बाजारात आपला सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने हा फोन Nokia C1 Plus नावाने लॉन्च केला गेला आहे जो गेल्या वर्षी लॉन्च झाला नोकिया सी1 स्मार्टफोनचा सक्सेसर आहे. कंपनीने हा फोन सध्या यूरोपियन बाजारात आणला आहे जो येत्या काही दिवसांत इतर देशांसह भारतात पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Nokia C1 Plus

नोकिया सी1 प्लस कंपनीने लॉन्च केलेला एक एंट्री लेवल स्मार्टफोन आहे जो स्टॅंडर्ड डिजाईन वर बनला आहे. फ्रंट पॅनल वर चारही बाजूला बेजल्स देण्यात आले आहेत तसेच स्क्रीन नॉच लेस आहे. हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.45 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन वरच्या बाजूला स्पीकर आणि सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे तसेच खालच्या बाजूला तसेच खालच्या भागावर Nokia ची ब्रँडिंग आहे.

Nokia C1 Plus अँड्रॉइड 10 च्या ‘गो एडिशन’ वर लॉन्च केला गेला आहे जो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉडकोर प्रोसेसर वर चालतो. फोन मध्ये चिपसेट कोणता हि माहिती अजूनतरी मिळाली नाही. नोकिया सी1 प्लस कंपनीने 1 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला iQOO U3 स्मार्टफोन, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia C1 Plus च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो 5 मेगापिक्सलचा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे दोन्ही कॅमेरा सेंसर एचडीआरला सपोर्ट करतात. कंपनीने आपल्या या नवीन स्मार्टफोन मध्ये डेडिकेटेड गुगल असिस्टंट बटन पण दिला आहे जो साईड पॅनल वर आहे.

Nokia C1 Plus एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि एफएम रेडियो सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 2,500एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. नोकिया सी1 प्लस बद्दल कंपनीचे म्हणणे आहे कि हा ड्यूरेबल पॉलीकार्बोनेट सेल वरून कवर केला गेला आहे जो फोनला टक्कर व हानी पोहोचू देत नाही.

हे देखील वाचा : 4 जीबी रॅम असलेल्या OPPO A15s चा पोस्टर झाला लीक, Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी बजेट मध्ये होईल लॉन्च

यूरोपियन बाजारात नोकिया सी1 प्लस 69 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि हि किंमत भारतीय करंसीनुसार 6,100 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन भारतात कधी लॉन्च होईल हे अजून स्पष्ट झाले नाही पण आशा आहे कि Nokia C1 Plus भारतात अजून कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होईल. इंटरनेशनल मार्केट मध्ये हा फोन रेड आणि ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.