नोकिया ब्रँडचे स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी HMD Global ने आतापर्यंत यावर्षी कोणताही स्मार्टफोन सादर केला नाही. पण अशा व्यक्त केली जात आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात सुरु होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस इवेंट मध्ये आपला नवीन फोन सादर करू शकते. पण या इवेंटच्या आधी Nokia चा नवीन फोन मॉडेल नंबर TA-1207 सह सर्टिफाइड झाला आहे, जो Nokia 1 (2020) म्हणजे Nokia 1.3 नावाने सादर केला जाऊ शकतो.
या फोनला एफसीसी कडून सर्टिफिकेशनस मिळाले आहे. तसेच या सर्टिफिकेशन मधून जे डॉक्यूमेंट समोर आले आहेत त्यानुसार फोन 146.56 x 70.46 मिलिमिटर्स सह येईल. याधारावर बोलले जात आहे कि फोन मध्ये 5.7 किंवा 5.8-इंचाची स्क्रीन असेल. तसेच FCC द्वारे समोर आले आहे कि फोन मध्ये 2920mAh बॅटरी (3000mAh) असेल.
या डिवाइस बद्दल आशा व्यक्त करण्यात येत आहे कि कंपनी हा नवीन डिवाइस Nokia 1 चा अपग्रेडेड वर्जन म्हणून सादर करेल. Nokia 2 सीरीजच्या आत कंपनीने नवीन मॉडेल सादर केला आहे. त्यामुलें आता Nokia 1.3 कंपनी मोठी बॅटरी आणि एंडरॉयड 10 (गो एडिशन) सह सादर करू शकते.
अलीकडेच HMD Global चे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर Juho Sarvikas यांनी एक ट्वीट केले होते. या ट्वीट मध्ये त्यांनी Adidas Originals चे स्नीकर्सचा फोटो पोस्ट केला होता. सोबत त्यांनी लिहले आहे कि मला हि Adidas Originals ची लिमिटेड एडिशन जोडी मिळाली आहे. याचा अर्थ असा आहे कि आपल्याला नवीन नोकिया ऑरिजनल फोन लॉन्च केला पाहिजे.
Juho Sarvikas यांच्या या ट्वीट नंतर बोलले जात आहे कि कंपनी आपला जुना फोन पुन्हा एकदा सादर करू शकते. याआधी पण कंपनीने असे केले आहे. एकेकाळी नोकिया मोबाईल फोनच्या दुनियेत लोकप्रिय होती. पण गेल्या काही वर्ष कंपनी आपले सिंहांसन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यावर्षी मोबाईल वर्ल्ड कांग्रेस म्हणजे MWC2020 ची सुरवात 24 फेब्रुवारीला होत आहे. आतापर्यंत कंपनीने Nokia 3310, Nokia 8110 4G आणि Nokia 2720 4G री लॉन्च केले आहेत.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Nokia 1.3 ब्लूटूथ एसआईजी वेबसाइट वर दिसला होता. फोनची लिस्टिंग डेट वेबसाइट वर 20 डिसेंबर 2020 ची होती. ब्लूटूथ एसआईजी वर हा आगामी नोकिया फोन Nokia TA-1213 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता जो ब्रँडचा आगामी डिवाईस Nokia 1.3 बोलला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार Nokia 1.3 कंपनीच्या आधीच्या स्मार्टफोन Nokia 1 Plus चा अपग्रेेडेड मॉडेल असेल.
