दोन आठवड्यांपूर्वी चीन मधील मल्टीप्लेक्स मध्ये लागलेल्या बिलबोर्ड वर नोकिया च्या नवीन स्मार्टफोनचे फोटो दिसले होते. फोटो वरून समजले की हा नोकिया कडून लॉन्च करण्यात येणारा नवीन स्मार्टफोन ‘नोकिया एक्स’ आहे ज्यात नॉच डिसप्ले आहे. काही काळातच हा फोटो इंटरनेट वर वायरल झाला होता. तसेच आज पुन्हा ‘नोकिया एक्स’ ची चर्चा टेक बाजारात सुरू झाली आहे. यावेळी स्वतः कंपनी ने या फोनची माहिती दिली आहे आणि नोकिया एक्स च्या लॉन्च डेट वरून पडदा हटवला आहे.
नोकिया मोबाईल ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक पोस्ट शेयर केली आहे ज्यात नोकिया एक्स च्या लॉन्च ची माहिती देण्यात आली आहे. या पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे की नोकिया आपला नॉच डिसप्ले वाला आगामी स्मार्टफोन 16 मे ला सादर करणार आहे. हा फोन अंर्तराष्ट्रीय बाजारात नोकिया एक्स किंवा नोकिया एक्स6 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. पण कंपनी ने फोन च्या स्पेसिफिकेशन्स वरून पडदा हटवला नाही. परंतु हे नक्की की हा फोन अॅप्पल आयफोन 10 प्रमाणे नॉच डिसप्ले वर लॉन्च होईल.
नोकिया एक्स/एक्स6 बद्दल आता पर्यंत समोर आलेले लीक्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ नॉच डिसप्ले वर लॉन्च केला जाईल. हा फोन स्टॉक एंडरॉयड आधारित असू शकतो सोबतच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 किंवा मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. कंपनी ने हा फोन 4जीबी रॅम व 6जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल.
नोकिया एक्स/एक्स6 मध्ये अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. सांगण्यात येत आहे की फोन च्या बॅक पॅनल वर लेईका चा डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. पण एचएमडी ग्लोबल कडून आता पर्यंत या फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची कोणतीच माहिती देण्यात आली नाही, त्यामुळे कंपनी च्या 16 मे ला होणार्या अधिकृत घोषणे कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
