Home बातम्या Nokia चा नवीन डाव तयार, 5G आणि 108MP कॅमेऱ्यासह घेऊन येत आहे आपला नवीन फोन

Nokia चा नवीन डाव तयार, 5G आणि 108MP कॅमेऱ्यासह घेऊन येत आहे आपला नवीन फोन

nokia 9 pureview

मार्केटमध्ये 5G ची वाढती मागणी मांग आणि 108एमपी कॅमेऱ्याच्या फोन्सच्या यादीत Nokia पण आपला नवीन फोन सादर करण्याची प्लानिंग करत आहे. जर तुम्ही पण नोकियाच्या नवीन स्मार्टफोनची वाट बघत असाल तर हि बातमी ऐकून तुम्ही खुश व्हाल. कारण Nokia च्या या अपकमिंग फोनमध्ये पुन्हा एकदा पेंटा (पाच) रियर कॅमेरा असतील. नोकिया पावर युजरच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये याचा खुलासा केला आहे. रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे कि या अपकमिंग स्मार्टफोनमधील प्राइमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे. कंपनीने याआधी नोकिया 9 प्योरव्यूमध्ये पेंटा रियर कॅमेरा सेटअप दिला होता. (Nokia X50 5G may come with 108 Megapixel Penta rear camera 6000MAH battery)

नोकिया पावर युजरचा दावा आहे कि कंपनी एका अपर मिड-रेंज फोनवर पेंटा-लेंस सेटअपसह काम करत आहे, जो नोकिया 8.3 5 जी स्मार्टफोनचा अपग्रेडेड वर्जन म्हणून सादर केला जाऊ शकतो. कंपनी या मार्केटमध्ये नोकिया 8.4 5G नावाने नाही तर एक्स-सीरीजचा फोन म्हणून बाजारात सादर करू शकते. हा फोन Nokia X50 नावाने लॉन्च करू शकते. पण अजूनही याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही.

हे देखील वाचा : Huawei Nova 8 Pro आणि Honor Play 20 स्मार्टफोन झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

असतील दमदार फीचर आणि स्पेसिफिकेशन

या अपकमिंग फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबाबत लीक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा प्योर डिस्प्ले V4 मिळेल. हा डिस्प्ले क्वॉड एचडी+ रेजोलूशन आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येऊ शकतो.

प्रोसेसर पाहता फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 775G चिपसेट असू शकतो. क्वॉलकॉमने हा चिपसेट अजूनही लॉन्च केला नाही. पण, बोलले जात आहे कि लवकरच हा चिपसेट मार्केटमध्ये येईल. तर काही एक्सपर्ट्सनुसार या फोनमध्ये स्नॅपड्रॅगॉन 780G चिपसेट मिळू शकतो.

हे देखील वाचा : लॉन्चपूर्वीच समोर आली Google Pixel 5A च्या कॅमेऱ्याची माहिती, Apple च्या स्वस्त फोनला देईल टक्कर

कॅमेरा आणि बॅटरीची पावर

फोनला पावर देण्यासाठी यात 6000mAh बॅटरी मिळू शकते. हि बॅटरी 22.5 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. तसेच फोनच्या कॅमेरा स्पेसिफिकेशनबाबत अजूनही जास्त माहिती बाहेर आली नाही. पण, प्राइमरी कॅमेरा व्यतिरिक्त यात एक अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, एक डेप्थ सेंसर, एक मॅक्रो शूटर आणि एक टेलिफोटो लेंस असेल. तसेच स्मार्टफोनमध्ये ZEISS ऑप्टिक्ससह OZO ऑडियो टेक्नॉलजी दिली जाईल.