स्वस्त रियलमी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर realme C53 तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो. कंपनीकडून Realme Days Sale 2024 ची सुरूवात करण्यात आली आहे जिथे ब्रँडचे मोबाईल फोनवर जबरदस्त डिल व डिस्काऊंट ऑफर दिले जात आहेत. 6GB RAM + 128GB Memory असलेला फोन जो 11,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता त्याला फक्त 9,199 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच यावर तुम्हाला 1,000 रुपयांची Bank Offer अनेक आर्कषक भेट पण मिळत आहेत.
रियलमी सी53 किंमत व ऑफर
डिस्काऊंट
रियलमी मोबाइल सी53 वर डिस्काऊंट मिळत आहे. फोनचा 6GB RAM + 128GB Memory व्हेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता जो 2,800 रुपये स्वस्त किंमतीत विकला जात आहे. स्कीम अंतर्गत याची किंमत आता 9,199 रुपये झाली आहे. यानुसार 4GB RAM + 128GB Storage realme C53 वर 1,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे, ज्यानंतर हा 9,999 रुपयांमध्ये लाँच झाला. व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
बँक ऑफर
realme C53 च्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटवर कंपनीकडून 1,000 रुपयांची बँक ऑफर दिली जात आहे तसेच 4 जीबी रॅम मॉडेलवर 500 रुपयांची बँक ऑफर मिळत आहे. Axis, ICICI, HDFC, IDFC, SBI आणि Yes Bank कार्ड्स किंवा यूपीआय पेमेंटवर हा कॅशबॅक मिळेल.
डिल्स
- आणखी अॅड-ऑन ऑफर्स पाहता MobiKwik च्या माध्यमातून फोन खरेदी करून पेमेंट केल्यावर युजर्सना ₹500 चा कॅशबॅक मिळेल.
- realme C53 सह realme Buds Air 5 खरेदी केल्यावर 1400 रुपयांची सूट मिळेल. तसेच 3699 रुपयांचे इअरबड्स 2299 मध्ये मिळतील.
- कंपनीकडून realme Buds Wireless 3 वर 600 रुपयांचा डिस्काऊंट पण दिला जात आहे. रियलमी सी 53 फोनसोबत हे खरेदी केल्यावर 1799 रुपयांचा नेकबँड 1199 रुपयांमध्ये मिळेल.
नोट : ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सादर केली आहे, जी या आठवड्यात समाप्त होईल. ऑफर आणि डिल्ससह realme C53 खरेदीसाठी येथे क्लिक करा
realme C53 स्पेसिफिकेशन
- 6.74″ 90Hz Display
- 12GB RAM (6+6)
- 128GB Storage
- UNISOC T612
- 108MP Rear Camera
- 18W 5,000mAh Battery
- स्क्रीन: रियलमी सी53 स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या एचडी डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 180 हर्ट्झ टच सेंपलिंग रेटला सपोर्ट करते. यावर 560 निट्स ब्राइटनेस पण मिळते.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर एफ/1.75 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा S5KHM6 सेन्सर आहे जो 3x In-sensor zoom ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर ब्लॅक अँड व्हाईट लेन्स पण आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी realme C53 एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
- प्रोसेसर: realme C53 अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो रियलमी युआय टी सह मिळून चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये UNISOC T612 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 1.82 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो.
- रॅम: भारतीय बाजारात हा रियलमी मोबाईल तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध झाला आहे. यात 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅमसह 64 जीबी मेमरी आणि 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. रियलमी सी 53 6GB Dynamic RAM Expansion टेक्नोलॉजीसह आहे, या इंटरनल रॅमला 12 जीबी पर्यंत वाढवू शकता.
- बॅटरी: पावर बॅकअपसाठी रियलमी सी53 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जो 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह मिळून चालतो.
- आणखी फिचर्स : realme C53 स्मार्टफोनमध्ये 2 टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर केला जाऊ शकतो. फोनमध्ये 150% UltraBoom speaker आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सारखे पर्याय पण मिळतात.
