Categories: बातम्या

Okaya नं लाँच केल्या या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर, इंजिनसह रेंज देखील फाडू

Okaya Electric Scooter: या फेस्टिव सीजनमध्ये जर तुम्ही पण नवीन इलेक्ट्रिक स्कूटी (Electric Scooter) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी नव्या पर्याय उपलब्ध झाला आहे. भारतात Okaya EV नं आपले New Electric Scooters सादर केल्या आहेत. ओकाया एक बॅटरी बनवणारी कंपनी आहे जिने भारतीय बाजारात आपल्या दोन नवीन स्कूटर्स घेऊन आली आहे. कंपनीनं या ई-स्कूटर्स फास्ट सीरीज अंतगर्त सादर केल्या आहेत, या स्कूटर्स Fasst F2B आणि Fasst F2T नावाने बाजारात आल्या आहेत.

Okaya Fasst F2B आणि Fasst F2T ची किंमत

या Electric Scooter ची किंमत पाहता Okaya Fasst F2B ची प्राइस 89,999 रुपये आणि Okaya Fasst F2T ची प्राइस 84,999 रुपये आहे. ही प्राइस एक्स शोरुम आहे. विशेष म्हणजे ओकायाचे भारतात 500 पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत, जिथून तुम्ही या इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेऊ शकता. फेस्टिवल सीजनमध्ये कंपनीच्या या स्कूटरची मोठ्या प्रमाणात करण्यात कंपनीची योजना आहे. यासाठी कंपनीनं एक ऑफर सादर केली आहे. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत ओकाया ई-स्कूटर खरेदी केल्यास तुम्ही कार, लॅपटॉप, टीव्ही, पैसे आणि खूप काही जिंकू शकता. हे देखील वाचा: 14,999 रुपयांमध्ये मिळवा 42 इंचाचा शानदार Smart TV; एक्सचेंज आणि बँक ऑफरमुळे एक्स्ट्रा डिस्काउंट

रेंज आणि टॉप स्पीड

कंपनीचा दावा आहे की ओकाया फास्ट F2B आणि F2T आपल्या 2000W मोटरच्या मदतीनं 70kmph चा टॉप स्पीड देतात. तसेच F2T एकदा चार्ज करून 85km की रेंज मिळेल. तर F2B सिंगल चार्जवर 70-80km रेंज देईल, असा दावा कंपनीनं केला आहे. कंपनीनं दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.2kWh LFP चा बॅटरी पॅक दिला आहे.

OKAYA FREEDUM

OKAYA ने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ई-स्कूटरचे दोन मॉडेल्स-FREEDUM LI-2 आणि FREEDUM LA-2 नावाने सादर केले होते. दोन्ही स्कूटर 250वॉट BLDC Hub Motor च्या पावरसह बाजारात आल्या होत्या. सिंगल चार्जमध्ये LI-2 मॉडेल 70 ते 80 किलोमीटर पर्यंत चालू शकतो, तर LA-2 मॉडेल 50 ते 60 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकतो. या दोन्ही मॉडेल्सवर ग्राहकांना 25Kmph चा टॉप स्पीड मिळतो. हे देखील वाचा: Netflix युजर्ससाठी वाईट बातमी! आता ‘या’ कामासाठी द्यावे लागणार एक्स्ट्रा पैसे

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

Published by
Siddhesh Jadhav