14,999 रुपयांमध्ये मिळवा 42 इंचाचा शानदार Smart TV; एक्सचेंज आणि बँक ऑफरमुळे एक्स्ट्रा डिस्काउंट

जर तुम्ही नवीन Smart TV विकत घेण्याचा विचार करत असाल तर फेस्टिवल सीजनमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर शानदार ऑफर मिळत आहेत. कंपनी स्मार्ट टीव्हीसह अन्य प्रोडक्ट्सवर देखील ऑफर देत आहे. आता आम्ही ज्या 42 इंचाच्या स्मार्ट टीव्ही बद्दल बोलत आहोत त्याची किंमत जवळपास अर्धी करण्यात आली आहे. म्हणजे Blaupunkt Cybersound Smart Tv वर सुमारे 14,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट दिला जात आहे. इतकेच नव्हे तर टीव्हीवर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया Blaupunkt TV वर मिळणाऱ्या सर्व ऑफर आणि फीचर्सची सविस्तर माहिती.

Blaupunkt Cybersound Smart TV Price

Flipkart वर Blaupunkt Cybersound 106 cm (42 inch) Full HD LED Smart Android TV वर शानदार ऑफर्स मिळत आहेत. या ऑफर्स अंतगर्त कंपनी तुम्हाला या TV वर सुमारे 50 टक्के डिस्काउंट देत आहे. म्हणजे 29,999 रुपयांमध्ये मिळणारा हा TV तुम्ही फक्त 14,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. त्यामुळे थेट तुमची 14,999 रुपयांची बचत होत आहे. हे देखील वाचा: Netflix युजर्ससाठी वाईट बातमी! आता ‘या’ कामासाठी द्यावे लागणार एक्स्ट्रा पैसे

बँक ऑफर पाहता, तुम्ही हा स्मार्ट टीव्ही SBI बँकेच्या क्रेडिट कार्डनं खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंतची सूट मिळू शकते. तसेच SBI च्या क्रेडिट कार्डनं EMI पेमेंट करून देखील 10 टक्क्यांपर्यंतची बचत करता येईल. खास बाब म्हणजे कंपनी टीव्हीवर मोठी एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमचा जुना टीव्ही विकायचा असेल तर तुम्हाला 11,000 रुपयांपर्यंतचा बोनस मिळू शकतो. तसेच तुम्ही नो कॉस्ट EMI आणि सामान्य EMI ऑप्शनच्या माध्यमातून हा टीव्ही सुलभ हप्त्यांवर विकत घेऊ शकता.

Blaupunkt Cybersound Smart TV Specifications

होम अप्लायंस आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट जर्मन ब्रँड निर्माता Blaupunkt नं CyberSound स्मार्ट टीव्हीमध्ये 106 CM म्हणजे 42 इंचाचा 1920 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेली Full HD LED स्क्रीन दिली आहे. हा स्मार्ट TV 40 वॉटच्या स्पिकर सह शानदार साउंड देतो. Blaupunkt CyberSound स्मार्ट TV मध्ये HDR10+ सपोर्ट देखील मिळतो. तसेच या TV मध्ये तुम्हाला चांगला व्हिज्युअल एक्सपीरिएंस मिळेल. कंपनीनं हा गेल्यावर्षी 2021 मध्ये लाँच केला होता. यात तुम्ही Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube सारखे अनेक अ‍ॅप्स वापरू शकता. तसेच यात अँड्रॉइड OS, गुगल असिस्टंट आणि इन-बिल्ट क्रोमकास्ट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हे देखील वाचा: Jio ची बोलती बंद! BSNL Plan मध्ये 80 दिवस मिळेल Unlimited Data, Calls आणि SMS

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here