Netflix युजर्ससाठी वाईट बातमी! आता ‘या’ कामासाठी द्यावे लागणार एक्स्ट्रा पैसे

Netflix Password: लोकप्रिय ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix चा पासवर्ड सहज शेयर केला जातो. अकाउंट युजर आपल्या मित्र किंवा कुटुंबियांना आपला पासवर्ड देत असतात. परंतु आता Netflix वर असं केल्यास आता तुम्हाला अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल. नेटफ्लिक्सनं स्पष्ट केलं आहे की ते 2023 पासून लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेयर करणाऱ्या युजर्सकडून अतिरिक्त पैसे घेणार आहेत. यासाठी स्ट्रीमिंग कंपनीला होणारा तोटा कारणीभूत आहे आणि सब्सक्रिप्शन काउंट देखील घसरला आहे. नेटफ्लिक्सनं सांगितलं की पासवर्ड शेयर केल्यामुळे त्यांच्या युजर्समध्ये वाढ होत नाही.

आता नेटफ्लिक्सनं प्रोफाईल ट्रांसफर नावाचं नवीन फीचरची (Netflix Profile Transfer Feature) घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीनं ओटीटी प्लॅटफॉर्म पासवर्ड शेयरिंग नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे. 2023 पासून हा नवीन नियम जारी केला जाईल आणि त्यानंतर पासवर्ड शेयर करण्यासाठी एक सब-अकाऊंट बनवावं लागेल, ज्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. हे देखील वाचा: Jio ची बोलती बंद! BSNL Plan मध्ये 80 दिवस मिळेल Unlimited Data, Calls आणि SMS

नटफ्लिक्सनं माहिती दिली की आम्ही प्रोफाईल ट्रांसफर फिचर लाँच केलं आहे. हे एक असं फीचर असेल जे तुमचं अकाऊंट वापरत आलेल्या लोकांना एक प्रोफाइल ट्रांसफर करण्यास मदत करेल. ही सुविधा 18 ऑक्टोबरपासून जगभरातील सर्व सदस्यांना देण्यात आली आहे.

कंपनीनं अजूनतरी पासवर्ड शेयर केल्यावर किती चार्ज द्यावा लागेल, याची माहिती दिली नाही. परंतु रिपोर्ट्स आणि सूत्रतांच्या माहितीनुसार पासवर्ड शेयरिंगची किंमत $3-$4 (जवळपास 250-330 रुपये) दरम्यान असू शकते. यासाठी भारतात किती पैसे मोजावे लागतील आणि कधी हे फीचर येईल, याची माहिती मात्र मिळाली नाही.

Netflix India plans

नेटफ्लिक्सचा भारतातील सर्वात स्वस्त प्लॅन आता फक्त 149 रुपये प्रति माहपासून सुरु होतो. तसेच प्रीमियम प्लॅन आता 799 रुपयांवरून 649 रुपये प्रति माह करण्यात आला आहे.

असं करा Netflix सब्सक्रिप्शन कॅन्सल

Netflix सब्सक्रिप्शन कॅन्सल करण्याच्या दोन पद्धती आहेत:

1. वेबसाइटच्या माध्यमातून बंद करा नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन

  • सर्वप्रथम Netflix वेबसाइट ओपन करा.
  • वेबसाइट ओपन केल्यानंतर तुमच्या लॉग इन आयडी आणि पासवर्डच्या मदतीनं साइन-इन करा.
  • साइन-इन केल्यानंतर Cancel streaming plan वर क्लिक करून तुम्ही तुमचं ऑटो सब्सक्रिप्शन बंद करू शकता.

2. नेटफ्लिपक्स अ‍ॅपवरून असं कॅन्सल करा सब्सक्रिप्शन

  • सर्वप्रथम अपने नेटफ्लिक्स अ‍ॅप ओपन करा.
  • त्यानंतर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात प्रोफाईल आयकॉनवर टॅप करा.
  • त्यानंतर Menu मध्ये खाली अकाऊंटवर टॅप करा.
  • त्यानंतर खाली स्क्रॉल करा आणि अपडेट बिलिंग डिटेलच्या खाली दिलेल्या कॅन्सल मेंबरशिपवर टॅप करा.
  • त्यानंतर नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग प्लॅन कॅन्सल करा.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here