Home बातम्या या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; अशी संधी पुन्हा नाही

या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; अशी संधी पुन्हा नाही

Highlights
  • ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरच्या काही मॉडेल्सवर स्पेशल ऑफर मिळत आहे.
  • या ऑफरमध्ये स्कूटर्सवर 12,500 रुपये पर्यंतची सूट दिली जात आहे.
  • ही ऑफर फक्त 15 फेब्रुवारी पर्यंत वैध असेल.

जर तुम्ही Valentine’s Day वर तुमच्या पार्टनरला शानदार गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर एक इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट करू शकता. सध्या ई-स्कूटरला जोरदार मागणी आहे आणि त्यामुळे पेट्रोलचा खर्च देखील होत नाही. ओकिनावा ऑटोटेकनं व्हॅलेंटाइन-डे ऑफर अंतगर्त इलेक्ट्रिक स्कूटरच्या काही मॉडेल्सवर स्पेशल डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये स्कूटर्सवर 12,500 रुपयांपर्यंतची सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीनं म्हटलं आहे की ही ऑफर फक्त 15 फेब्रुवारी पर्यंत वैध असेल.

या स्कूटर्सवर मिळतोय डिस्काउंट

भारतात दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी ओकिनावानं घोषणा केली आहे की स्पेशल व्हॅलेंटाइन डे डिस्काउंट ऑफर अंतगर्त ग्राहक iPraise+, PraisePro आणि Ridge+ सारखे हाय-स्पीड मॉडेल आणि R30 आणि लाइट सारखे लो-स्पीड स्कूटर्स ऑफरमध्ये विकत घेऊ शकतील.

ओकिनावा ई-स्कूटर्सची प्राइस

ओकिनावा प्राइस प्रोची प्रारंभिक किंमत 99,645 रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. कंपनीनुसार, ही स्कूटर सिंगल चार्जवर 88 किलोमीटरची रेंज देते तसेच ताशी 58 किलोमीटरचा टॉप स्पीड मिळतो.

Okinawa iPraise+: ओकिनावा आयप्रेज प्लसची दिल्लीमध्ये एक्स शोरूम किंमत 1.46 लाख रुपये आहे. या स्कूटरची रायडिंग रेंज 139 किलोमीटर आहे तर ताशी 58 किलोमीटरचा टॉप स्पीड मिळतो.

Okinawa R30: ओकिनावा आर30 ची किंमत 61,998 रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. कंपनीच्या दाव्यानुसार सिंगल चार्जवर ही स्कूटर 60 किलोमीटरची रेंज देते, जोडीला ताशी 25 किलोमीटरचा टॉप स्पीड मिळतो.

Okinawa Ridge+: ओकिनावा रिज प्लसची प्रारंभिक किंमत 76,285 रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. ही स्कूटर फुल चार्ज केल्यावर 84 किलोमीटरची रेंज मिळते आणि या रेंजसह ताशी टॉप स्पीड मिळतो.

Okinawa Lite: ओकिनावा लाइट स्कूटर 66,993 रुपयांची प्रारंभिक किंमतीसह दिल्लीमधून विकत घेता येईल. या स्कूटरची सिंगल चार्ज रेंज 60 किलोमीटर आहे जी ताशी 25 किलोमीटर टॉप स्पीड देते.

एक्सटेंडेड वॉरंटी प्रोग्राम

तसेच ओकीनावा ऑटोटेकनं किफायतशीर किंमतीत आपला एक्सटेंडेड वॉरंटी प्रोग्राम लाँच केला आहे, ज्यात कमीत कमी 2287 रुपये पासून 5494 रुपयेपर्यंतच्या ऑफर दिल्या जात आहे. ओकिनावाकडून मिळणारी एक्सटेंडेड वॉरंटी 2 वर्षांपर्यंत लागू केली जाईल. स्कूटरच्या मॉडेलची रेंजनुसार वेगवेगळे स्लॅब सादर केले आहेत. ग्राहक आपल्या मॉडेल नुसारवॉरंटीचा लाभ घेऊ शकतील. तसेच ही वॉरंटी नवीन ग्राहकांसह त्या सर्व ग्राहकांसाठी वैध असेल ज्यांनी गेल्या 3 वर्षांत ओकिनावाचे वाहन घेतले आहे.