Home बातम्या 15 ऑगस्टला येतेय Ola ची Electric Car! सर्वांची करणार सुट्टी

15 ऑगस्टला येतेय Ola ची Electric Car! सर्वांची करणार सुट्टी

गेल्यावर्षी 15 ऑगस्टला OLA electric scooter सादर करण्यात आली होती. आता वर्षभरानंतर ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी हिंट दिली आहे की कंपनी लवकरच आपल्या ईव्ही रेंजचा विस्तार करत OLA Electric Car देखील लाँच करेल. तसेच भाविश अग्रवाल यांनी असं देखील सांगितलं होतं की कंपनी इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक कार (Electric Car and Electric Car) क्षेत्रात एंट्री करण्याचा विचार करत आहे. आता ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर आगामी ओला प्रोडक्ट बद्दल एक टीजर जारी केला आहे, ज्यावरून स्पष्ट झालं आहे की ओला इलेक्ट्रिक भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्टला एक नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करणार आहे. कंपनीचं आगामी प्रोडक्ट इलेक्ट्रिक कार असेल, अशी चर्चा आहे.

OLA Electric Car होणार लाँच!

ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी गुरुवारी रात्री उशिरा एक महत्वाची घोषणा केली. भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर पोस्ट शेयर करून लिहले की, “या 15 ऑगस्टला एक नवीन प्रॉडक्टची घोषणा करण्यासाठी खूप उत्सुक आहे. आम्ही आमचे भविष्यातील मोठ्या योजनांची माहिती देऊ.” ओला इलेक्ट्रिकला केंद्र सरकारच्या पीएलआय योजनेत समाविष्ट करण्यात आलं आहे, ज्यामुळे ईव्ही निर्माण करणाऱ्या कंपनीला भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनवण्यासाठी लिथियम-आयन सेलवर काम करण्याची परवानगी मिळेल.

अशी असेल ओला इलेक्ट्रिक कारची डिजाइन

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या टीजर व्हिडीओनुसार ओला इलेक्ट्रिक कारची डिजाइन खूप फ्यूचरिस्टिक असेल. यात नवीन व लेटेस्ट फीचर्स सोबतच जास्त रेंज देखील दिली जाईल, अशी चर्चा आहे. ओला इलेक्ट्रिक कारमध्ये स्लीक एलईडी हेडलॅम्प्स, स्लॉपी विंडशील्ड आणि स्पोर्टी अलॉय व्हील्ज मिळतील. तर, फ्रंट ग्रिल्स आणि डोर हँडल्स मात्र मिळणार नाहीत. गेल्यावर्षी भाविश अग्रवाल यांनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या कॉन्सेप्ट इमेज शेयर केल्या होत्या.

आधी शेयर केलेले फोटोज पाहता ई-कारमध्ये एलईडी लाईट्स व्यतिरिक्त ही कार कॉम्पॅक्ट साईज केबिनमध्ये सादर केली जाऊ शकते. कारसह टॅबलेट सारखी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. तसेच कारमध्ये स्पोर्टी सीट्स आणि 360-डिग्री ग्लास पॅनल मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे केबिनमध्ये खूप जागा असल्याचा भास होईल. कंपनी कारमध्ये स्पोर्टी अलॉय व्हील्स देऊ शकते.

Ola EV cars आणि स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होईल लाँच

19 जूनला तामिळनाडुमधील ओला फ्यूचरफॅक्ट्रीमध्ये सर्व ग्राहकांना बोलवण्यात आले होते. त्यांना फॅक्टरीला भेट देण्याची संधी देऊन कंपनीनं या कारचा टीजर जारी केला होता. तर दुसरीकडे 91मोबाईल्सला एक्सक्लूसिवली टिप्सटर Yogesh Brar नं माहिती दिली होती की कंपनी दोन Ev मॉडेलवर काम करत आहे, ज्यात एक SUV आणि दुसरी sedan असेल. या कार्स 2023 च्या अखेरपर्यंत भारतात लाँच केल्या जातील. तसेच कंपनी एक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याची तयारी करत आहे.