वनप्लसचा फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात आणि बजेट थोडे कमी आहे तर ही डील तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. कारण ब्रँडच्या नंबर सीरीजचे OnePlus 11 5G ला सध्या 23,000 रुपये कमीमध्ये विकले जात आहे. हा डिस्काऊंट ऑनलाईन शॉपिंग साईट अॅमेझॉन मिळेल. या सूटसह नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर पण उपलब्ध आहे. चला, पुढे तुम्हाला डिव्हाईसची नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशनबाबत सविस्तर जाणून घेऊया.
OnePlus 11 5G ऑफरची माहिती
- अॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर OnePlus 11 मात्र 38,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या डिव्हाईसच्या 16GB रॅम +256 जीबी स्टोरेज ऑप्शनची किंमत आहे.
- ब्रँडने फोनवर पूर्ण 23,000 रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे. तसेच, कंपनी वेबसाईटवर सध्या हा फोन उपलब्ध नाही.
- 23,000 रुपयांच्या मोठ्या डिस्काऊंट सोबत तुम्हाला नो कॉस्ट EMI चा ऑप्शन पण मिळेल.
- जुन्या फोनला एक्सचेंज केल्यावर पण जवळपास 31,500 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे, परंतु जुन्या फोनच्या किंमत कंडीशनवर निर्भर करेल.
- ही OnePlus 11 5G ची आतापर्यंतची सर्वात स्वस्त किंमत आहे. यामुळे ही डील युजर्ससाठी चांगली आहे.
काय तुम्हाला OnePlus 11 5G घ्यायचा आहे
साल 2023 मध्ये लाँच केलेल्या 61,999 असणाऱ्या OnePlus 11 ला सध्या 38,999 रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी चांगला पर्याय आहे. हा डिव्हाईस दमदार आहे. यात 16GB पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज मिळेल. परफॉर्मन्ससाठी स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप तसेच 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा पण आहे. तसेच, बॅटरीच्या बाबतीत 5000mAh बॅटरी आणि चार्जिंगसाठी 100वॉट फास्ट चार्जिंग मिळते.
OnePlus 11 5G चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: वनप्लस 11 5जी फोनमध्ये 6.7 इंचाचा क्वॉडएचडी+ सुपर फ्ल्यूड अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 20.1:9 अॅस्पेक्ट रेशियो, 3216 x 1440 पिक्सल रिजॉल्यूशन, 120 हर्ट्स रिफ्रेश रेट मिळतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन आहे.
- चिपसेट: वनप्लस 11 स्मार्टफोन 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो. ज्यामुळे ग्राहकांना 3.2 गीगाहर्ट्स हाय क्लॉक स्पीड मिळते.
- स्टोरेज: हा वनप्लस मोबाईल 16GB LPDDR5X RAM आणि 256GB UFS4.0 इंटरनल स्टोरेज टेक्नॉलॉजीसह येतो.
- कॅमेरा: फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50MP Sony IMX890 प्रायमरी, एफ/2.2 अपर्चर असणाऱ्या 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि एफ/2.0 अपर्चर असणारी 32MP Sony IMX709 Telephoto लेन्स आहे. तसेच, सेल्फीसाठी एफ/2.45 अपर्चर असलेला 16MP Sony IMX471 सेन्सर आहे.
- बॅटरी: वनप्लस 11 5 जी मध्ये तुम्हाला 5,000 एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. याला चार्ज करण्यासाठी 100 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंगची सुविधा आहे.
