Home बातम्या Oneplus 12 ची माहिती आतापासूनच लीक होण्यास सुरु; कॅमेरा आणि प्रोसेसरचा झाला खुलासा

Oneplus 12 ची माहिती आतापासूनच लीक होण्यास सुरु; कॅमेरा आणि प्रोसेसरचा झाला खुलासा

Highlights
  • हा Snapdragon 8 Gen 3 सह येऊ शकतो.
  • फोनमध्ये नवीन पेरिस्कोप कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो.
  • हा Oneplus 11 सीरीजपेक्षा जास्त पावरफुल असेल.

Oneplus 11 5G फोन यंदा फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच झाला आहे ज्याची किंमत 56,999 रुपयांपासून सुरु होते. ह्या फ्लॅगशिप फोन नंतर आता कंपनी आपल्या नवीन ‘नंबर सीरीज’ कडे वाटचाल करत आहे ज्याची सुरुवात Oneplus 12 पासून होईल. ह्या स्मार्टफोन संबंधित बातमी एका लीकच्या माध्यमातून समोर आली आहे ज्यात वनप्लस 12 च्या स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख करण्यात आला आहे.

वनप्लस 12 प्रोसेसर

Oneplus 12 संबंधित माहिती मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर डिजीटल चॅट स्टेशननं शेयर केली आहे. टिपस्टरनं दावा केला आहे की हा नवीन वनप्लस फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह लाँच केला जाईल. विशेष म्हणजे क्वॉलकॉमनं अजून स्नॅपड्रॅगन 8 ची तीसरी पिढी सादर केली नाही, जी यंदा उत्तराधार्त बाजारात येऊ शकते.

यावरून स्पष्ट झालं आहे की क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मार्केटमध्ये आल्यानंतरच वनप्लस 12 स्मार्टफोन लाँच होईल. हा फोन भारतीय बाजारात येईस्तोवर साल 2023 चा अखेर उजाडू शकते. विशेष म्हणजे हा चिपसेट ह्या सीरीजच्या मोठ्या मॉडेल म्हणजे Oneplus 12 Pro मध्ये देखील मिळू शकतो.

वनप्लस 12 कॅमेरा

टिपस्टरनुसार वनप्लस कंपनी एक नवीन पेरिस्कोप कॅमेऱ्याची टेस्टिंग करत आहे ज्याचा प्रोडक्ट कोड “SM8650” आहे. सध्या ह्या कॅमेरा सेन्सरच्या फीचर्स संबंधित जास्त डिटेल्स समोर आलेली नाही परंतु आधी चर्च आहे की हीच लेन्स वनप्लस 12 सीरीजमध्ये दिली जाईल. Oneplus 12 आणि Oneplus 12 Pro मॉडेल्सचा कॅमेरा जुन्या Oneplus 11 सीरीजपेक्षा जास्त अ‍ॅडव्हान्स असेल तसेच चांगली झूम क्वॉलिटी मिळेल.

OnePlus 11 5G प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स

भारतीय बाजारातील फ्लॅगशिप वनप्लस 11 5जी फोन पाहता ह्यात 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाचा क्वॉडएचडी+ सुपर फ्ल्यूड अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालतो.

फोटोग्राफीसाठी ह्याच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 + 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स + 32MP Sony IMX709 पोर्टरेट टेली लेन्स देण्यात आली आहे. तसेच फ्रंट पॅनलवर 16MP Sony IMX471 सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी ह्यात 100वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.