Home बातम्या OnePlus 13 कसा असेल? येथे जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन यांचे सर्व लीक तपशील

OnePlus 13 कसा असेल? येथे जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन यांचे सर्व लीक तपशील

वनप्लस हा एक असा मोबाईल ब्रँड आहे ज्याने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करताच प्रीमियम सेगमेंटच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे त्याला ‘फ्लॅगशिप किलर’ असा टॅग मिळाला होता. या कंपनीचा पहिला फोन 2014 मध्ये OnePlus One होता आणि आता दहा वर्षानंतर कंपनी OnePlus 13 घेऊन येत आहे. पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये वनप्लस 13 लाँच केला जाऊ शकतो. या मोबाईलमध्ये कोणते खास फिचर्स आढळू शकतात? सोबतच या फोनशी संबंधित लीक झालेली सर्व माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus 13 लाँच तपशील

काही काळापूर्वी अशी बातमी येत होती की OnePlus 13 डिसेंबर महिन्यात लाँच होईल. पण आता या फोनशी संबंधित माहिती समोर येत आहे की OnePlus 13 ऑक्टोबरमध्ये लाँच होऊ शकतो. कंपनीने अद्याप कोणतीही ठोस माहिती दिलेली नसली तरी असा आमचा अंदाज आहे की सर्वप्रथम हा मोबाईल चीनमध्ये दाखल होईल आणि नंतर तो भारतीय बाजारात उपलब्ध केला जाईल. हा फोन डिसेंबर 2024 मध्येच भारतात आणि जागतिक बाजारात लाँच केला जाऊ शकतो.

वनप्लस 13 हा ब्रँडचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असेल जो फ्लॅगशिप श्रेणीमध्ये आणला जाईल. या मोबाईलची किंमत 60 हजार रुपयांपेक्षा जास्त ठेवली जाईल. आमचा अंदाज आहे की हा मोबाईल 12 जीबी रॅम आणि 16 जीबी रॅमवर लाँच केला जाईल यामध्ये 256 जीबी स्टोरेज ते 512 जीबी मेमरी पर्याय मिळतील. टेक जगतात चर्चा आहे की यावेळी वनप्लस आपल्या मोबाईल फोनमध्ये 1 टीबी स्टोरेज देखील आणू शकते, ज्याचा दर सुमारे 80 हजार रुपये ठेवला जाऊ शकतो.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की OnePlus 12 5G फोन जानेवारी 2024 मध्ये लाँच झाला होता ज्याच्या 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा दर 64,999 रुपये होता आणि त्याच्या 16 जीबी + 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये होती.

OnePlus 13 एआय फिचर्स

हे एआयचे युग आहे! हे वाक्य मोबाईल कंपन्या देखील अतिशय गांभीर्याने घेत आहेत आणि वनप्लस देखील तेच करणार आहे. वनप्लस 13 आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. हे एआय तंत्रज्ञान फोनच्या फिचर्स मध्ये प्रगती आणेल. फोटो काढण्यापासून ते एडिट करण्यापर्यंत एआयचा वापर केला जाईल. अनेक नवीन एडिटिंग टूल्स आणि फिल्टर या तंत्रज्ञानासह मोबाईलमध्ये जोडले जातील.
एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने फोन सोशल मीडियासाठी तयार केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान वापरकर्त्याची गोपनीयता आणि डेटा यांना अतिरिक्त सुरक्षित बनवेल. विविध ॲप्स आणि वेबसाईट्सवर तयार केलेल्या पासवर्डपासून ते बँक आणि कार्डचे तपशील फोनमध्ये सुरक्षितपणे साठवले जाऊ शकतात. फोनचा यूजर इंटरफेस देखील ग्राहकांच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार बदलता येऊ शकतो.

OnePlus 13 चे स्पेसिफिकेशन

प्रोसेसर

वनप्लस 13 मध्ये अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी बनवला गेलेला आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली मोबाईल चिपसेट दिला जाईल. अशी चर्चा आहे की हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 प्रोसेसरवर लाँच केला जाईल. हा एक 8-कोर प्रोसेसर असेल ज्यामध्ये 4.09 गिगाहर्ट्स पर्यंतच्या क्लॉक स्पीडने रन करण्यास सक्षम असलेला ओरियन सीपीयू असेल आणि मदतीसाठी 2.78 गिगाहर्ट्झ पर्यंतचे स्पीड असलेले कोर देखील देण्यात येतील.

तुम्हाला सांगतो की, गुगल ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच अँड्राईड ओएस वर चालणारा कोणत्याही मोबाईल फोनमध्ये अद्याप इतकी क्लॉक स्पीड असलेला प्रोसेसर दिला गेलेला नाही. हा मोबाईल चिपसेट OnePlus 13 ला सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली मोबाईल फोन बनवेल, जो सध्याच्या Samsung Galaxy S24 सीरीजपेक्षा अधिक शक्तिशाली असेल. तर ग्राफिक्ससाठी वनप्लस 13 मध्ये ॲड्रेनो 760 जीपीयू देखील पहायला मिळू शकते.

काही रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहे की वनप्लस 13 हा स्मार्टफोन 24 जीबी रॅम सह लाँच केला जाऊ शकतो. सध्या भारतात असा कोणताही मोबाईल फोन नाही जो 24 जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करेल. असे तंत्रज्ञान OnePlus Edge 3 Pro मध्ये दिसले होते जो चीनमध्ये लाँच झाला होता. आता वनप्लस 13 मध्ये देखील त्याच LPDDR5x रॅमला आणले जाऊ शकते. यासोबतच आगामी वनप्लस स्मार्टफोनमध्ये 1टीबी यूएसएफ 4.0 स्टोरेज देखील पहायला मिळू शकते.

कॅमेरा

वनप्लस 13 हा Hasselblad कॅमेरासह आणला जाईल. सध्याच्या फ्लॅगशिप वनप्लस मोबाईलमध्येही याच कंपनीचे सेन्सर पहायला मिळाले आहेत. नवीन स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. फोनच्या मागील पॅनलवर 50 मेगापिक्सेलचा एलवायटी-808 मुख्य सेन्सर मिळू शकतो, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (ओआयएस) तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.

वनप्लस 13 च्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेलची LYT-600 अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 50 मेगापिक्सेलचा एलवायटी-600 पेरिस्कोप सेन्सर देखील दिला जाऊ शकतो जो 3x झूम क्षमतेने सुसज्ज असेल. फोनमध्ये वाईड अपर्चर आणि फील्ड ऑफ व्ह्यू दिसू शकतो.

सेल्फी काढणे, व्हिडिओ कॉलिंग करणे आणि रिल्स बनवण्यासाठी वनप्लस 13 मध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. आगामी वनप्लस स्मार्टफोनमध्ये एचडीआर, ऑटोफोकस, 4के व्हिडिओ, डॉल्बी व्हिजन, स्मार्ट सीन रेकग्निशन आणि ड्युअल-व्ह्यू व्हिडिओ यांच्यासह गुगल लेन्स सारखे फिचर्स देखील मिळू शकतात.

डिस्प्ले

वनप्लस 13 5G फोन 8टी एलटीपीओ बीओई एक्स2 डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. लीकवर विश्वास ठेवला तर ही 6.8 इंचाची स्क्रीन असेल जी ओएलईडी पॅनेलवर बनलेली असेल. या स्मार्टफोन डिस्प्लेला क्वाड मायक्रो कर्व्ह डिझाईनवर बनवले जाऊ शकते जो चारी बाजूंनी मागील पॅनेलच्या बाजूला वाकला असेल. फोनला कोणत्याही बाजूने पकडल्यास त्याची स्क्रीन स्पष्टपणे दिसू शकते.

समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार वनप्लस 13 5G फोनची स्क्रीन 2K पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. त्यावर 120हर्ट्झ किंवा 144 हर्ट्स रिफ्रेश रेट मिळू शकतो. तर, फोन स्क्रीनवर 4,500 निट्स किंवा 6000 निट्स पीक ब्राईटनेसचा सपोर्ट ही दिला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की वनप्लस 13 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. हे अल्ट्रासोनिक सेन्सर असू शकते.

बॅटरी आणि चार्जिंग

सर्वप्रथम चार्जिंग तंत्रज्ञानाबद्दल बोलायचे झाल्यास वनप्लस 13 5G फोन 100 वॉट फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज करून बाजारात आणला जाऊ शकतो. हे सुपरवूक तंत्रज्ञान असेल ज्यामुळे मोबाईल काही मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. तर आगामी वनप्लस स्मार्टफोनमध्ये 50 वॉट वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान देखील असेल ज्यामुळे डिव्हाईसला केबलशिवाय चार्ज करता येईल.

पॉवर बॅकअपसाठी वनप्लस 13 मध्ये 6,000 एमएएच ची बॅटरी दिल्याची बाब लीकमध्ये समोर आली आहे. ही एक ड्युअल-सेल बॅटरी असेल जी फोन दीर्घकाळ चालू ठेवेल. अशी चर्चा आहे की ही सिलिकॉन-कार्बन मटेरियलवर बनलेली असेल ज्यामुळे फोनच्या बॅटरीचे आरोग्य राखले जाईल. फोनची बॅटरी बदलत्या तापमानातही चांगले काम करेल आणि

चार्जिंग कमी असले तरीही डिव्हाईसला अनेक तास मोडमध्ये सक्रिय ठेवण्यास सक्षम असेल.

टीप: वरील तपशील लीक झालेल्या अहवाल आणि सर्टिफिकेशनच्या आधारे सांगण्यात आला आहे. सध्या कंपनीकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आम्हाला अधिकृत माहिती मिळताच हा लेख अपडेट केला जाईल.