OnePlus ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 14 ऑक्टोबरला आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियो मध्ये विस्तार करत नवीन स्मार्टफोन OnePlus 8T टेक मंचावर सादर करणार आहे. या दिवशी वनप्लस 8टी चा ग्लोबल लॉन्च होईल आणि 14 ऑक्टोबरलाचा हा मोबाईल भारतीय बाजारात पण येईल. कंपनीने OnePlus 8T च्या लॉन्च बद्दल सांगितल्यानंतर आता या फोनशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे, ज्यात लॉन्चच्या आधीच फोनच्या किंमतीचा खुलासा केला गेला आहे.
OnePlus 8T बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. फोनचा पहिला वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे सांगण्यात आले आहे. लीकनुसार वनप्लस 8टी चा 8 जीबी रॅम वेरिएंट 799 यूरो आणि 12 जीबी रॅम वेरिएंट 899 यूरो मध्ये लॉन्च केला जाईल. हि किंमत भारतीय करंसी अनुसार 69,000 आणि 77,000 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे कि भारतात या फोनची किंमत यूरोपच्या तुलनेत काहीशी कमी असेल.
The next addition to the OnePlus line up is ultra smooth, ultra fast and all things extreme. And, #UltraStopsAtNothing.
Get ready for the #OnePlus8T5G
Get Notified: https://t.co/faf4p8m1jC pic.twitter.com/wolJ7RreB9
— OnePlus India (@OnePlus_IN) September 21, 2020
OnePlus 8T एक 5G फोन असेल आणि हा 5जी कनेक्टिविटी फीचर सह भारतीय बाजारात येईल. या फोनचा लॉन्च ईवेंट 14 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल, जो कंपनी द्वारे सर्व अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव दाखवला जाईल. शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण वनप्लस 8टी चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि भारतात या फोनची विक्री अमेझॉन वरच होईल.
OnePlus 8T
वनप्लस 8टी चे संभावित स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोन मध्ये 6.55 इंचाच्या डिस्प्ले सह फुल-एचडी+ रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असेल. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 865+ प्रोसेसर सह येईल, त्या सोबतच दोन कॉन्फिग्रेशन दिले जातील. यातील एक 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि दुसऱ्या मध्ये 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज सहा येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित OxygenOS 11 सह येऊ शकतो.
लीकनुसार फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल, त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर दिला जाईल. सोबत एक 2 मेगापिक्सलचा पोट्रेट सेंसर पण या कॅमेरा सेटअपचा भाग असेल. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी वनप्लस 8टी फोन मध्ये 32 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल, जो होल-पंच कटआउट सह स्क्रीनच्या वरच्या बाजूला असेल. तसेच बोलले जात आहे कि फोन मध्ये 4,500 एमएएच च्या बॅटरी सह 65 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.
