Home बातम्या OnePlus 9 Pro ची डिजाइन झाली लीक, लॉन्चच्या आधी बघा फोनचा लुक

OnePlus 9 Pro ची डिजाइन झाली लीक, लॉन्चच्या आधी बघा फोनचा लुक

OnePlus बद्दल काही दिवसांपूर्वीच समोर आली होती कि कंपनी आपल्या नवीन सीरीज वनप्लस 9 वर काम करत आहे, जी पुढल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये मिड मार्च मध्ये सादर केली जाऊ शकते. या नवीन सीरीज मध्ये लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro असतील. अलीकडेच दोन्ही स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट वर स्पॉट केले गेले होते. काही आठवड्यांपूर्वी 91mobiles ने एक्सक्लूसिवली OnePlus 9 च्या लाइव इमेज आणि कॅमेरा डिटेलची माहिती दिली होती. आता OnePlus 9 Pro चे रेंडर्स समोर आले आहेत. हे रेंडर्स OnLeaks ने Voice वेबसाइटच्या माध्यमातून शेयर केले आहेत. टिप्सटरचा दावा आहे कि इमेजेस प्रोटोटाइप वर आधारित आहेत. तसेच आम्हाला फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती पण मिळाली आहे.

डिजाइन असेल अनोखी

वनप्लस 9 प्रो च्या डिजाइनबाबत आता खास माहिती समोर आली आहे. OnLeaks ने आपल्या एका रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि वनप्लस 9 प्रो ची डिजाइन वनप्लस 8 आणि 8T ची डिजाइन मर्ज करून बनवली जाईल. हे फोन्स काही दिवसांपूर्वीच लॉन्च झाले होते.

रेंडर्स नुसार OnePlus 9 Pro मध्ये फ्रंटला टॉप लेफ्ट मध्ये पंच-होल कटआउट असेल. तसेच मागे ग्लास पॅनल असेल. फोनच्या टॉप बेजल वर स्पीकर आणि उजवीकडे अलर्ट स्लाइडर व पावर बटन असेल. तसेच डावीकडे वॉल्यूम रॉकर बटन असेल. OnePlus 9 Pro मध्ये OnePlus 8T प्रमाणेच आयताकृती कॅमेरा मॉड्यूल असेल. OnLeaks चा दावा आहे कि फोन मध्ये चार पैकी दोन लेंस मोठ्या मेटल रिंग मध्ये असतील जो मुख्य कॅमेरापेक्षा मोठा वाटतो. टिपस्टरने पुन्हा सांगितले कि वनप्लस 9 सीरीज मार्च मध्ये सादर केली जाईल.

OnePlus 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9 Pro बद्दल बोलले जात आहे कि यात 6.67-इंचाचा कर्व्ड डिस्प्ले असेल जो स्लिम बेजल सह येईल. यात कमीत कमी 120Hz रिफ्रेश रेट दिला जाईल. तसेच हँडसेट क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 875 SoC आणि 8GB रॅम सह येईल. OnePlus 9 Pro बद्दल अफवा आहे कि फोन मध्ये 65W फास्ट-चार्जिंग आणि अँड्रॉइड 11-बेस्ड ऑक्सिजन ओएस असेल. स्टोरेज वेरिएंट म्हणून फोन मध्ये 128GB आणि 256GB ऑप्शन असतील. याव्यतिरिक्त OnePlus 9 Pro ची इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.