Home बातम्या वनप्लसने केली मोठी तयारी, 8 मार्चला होईल OnePlus 9 सीरीज लॉन्च, जाणून घ्या सर्वकाही

वनप्लसने केली मोठी तयारी, 8 मार्चला होईल OnePlus 9 सीरीज लॉन्च, जाणून घ्या सर्वकाही

OnePlus 9 सीरीजच्या लॉन्च डेटचा खुलासा करण्यासाठी कंपनी पूर्णपणे तयार दिसत आहे. या सीरीजच्या इंडिया लॉन्च डेट बद्दल कंपनी 8 मार्चला माहिती देईल. याचा खुलासा कंपनीने आपल्या OnePlus इंडिया वेबसाइटवर एक ऑफिशियल टीजर प्रसिद्ध केला आहे. बोलले जात आहे कि या लाइनअपमध्ये कंपनी OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9R लॉन्च करेल, ज्याची माहिती काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सने दिली आहे. तसेच टिप्सटर Mukul Sharma ने ट्विट करून सांगितले आहे कि OnePlus 9 सीरीज 23 मार्चला लॉन्च केली जाईल. (oneplus 9 series launch date revealed on march 8th india launch tipped)

फोनसह स्मार्टवॉच होईल लॉन्च

काही दिवसांपूर्वी वनप्लस 9R बाबत टिप्स्टर इवान ब्लासने माहिती दिली होती. हा फोन OnePlus 9E/9 Lite म्हणून पण ओळखला जात होता. दुसरीकडे वनप्लसचे CEO पीट लाउ यांनी आधीच कंपनीच्या स्मार्टवॉचची माहिती दिली होती. हा वॉच OnePlus Watch नावाने येईल. 91मोबाईल्सने एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि मार्च मध्ये OnePlus 9R, OnePlus Watch आणि दोन प्रोडक्ट सादर केले जातील.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy M12 फोन, 11 मार्चला होईल भारतात लॉन्च

OnePlus 9 Pro चे असतील हे स्पेसिफिकेशन

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार OnePlus 9 Pro हार्डवेयर आणि फीचर्सच्या बाबतीत पूर्णपणे एक फ्लॅगशिप फोन असेल. यात Snapdragon 888 चिपसेट व्यतिरिक्त 6.7-इंचाचा QHD+ डिस्प्ले अडॅप्टिव 120Hz रिफ्रेश रेटसह दिली जाईल. तसेच लीकमध्ये समोर आले आहे कि फोनमध्ये 48MP प्राइमरी सेंसर असेल जो Hasselblad ब्रँडिंगसह येईल. फोनमध्ये 64MP अल्ट्रा-वाइड अँगल सेंसर आणि 3.3x झूम कॅमेरा असेल. सांगण्यात आले आहे कि फोन 4,500mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो. रॅम व स्टोरेज पाहता या डिवाइस मध्ये 8GB रॅम आणि 128GB ची स्टोरेज दिली जाईल.

OnePlus 9E चे असतील हे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9E बद्दल बोलायचे तर हा या सीरीजचा अफोर्डेबल वेरिएंट असेल. आधी समोर आलेल्या अफवांनुसार या फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट असेल. लेटेस्ट लीकमध्ये पण हीच गोष्ट समोर आली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि फोनमध्ये 6.5-इंचाच्या 90Hz डिस्प्लेसह FHD+ रिजोल्यूशन असेल. तसेच फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB ची स्टोरेज दिली जाईल.

हे देखील वाचा : हीरो बनून येत आहेत OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro+ 5G फोन, वरूण धवनने शेयर केला फोटो

फोटोग्राफीसाठी OnePlus 9E मध्ये 64-मेगापिक्सलचा मेन सेंसर आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड यूनिट असेल. याव्यतिरिक्त रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी पण असू शकते. बातमी अशी आली आहे कि वनप्लस पुढल्या महिन्यात भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये आपली वनप्लस 9 सीरीज लॉन्च करणार आहे.

OnePlus 9 मध्ये असू शकतात हे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9 बद्दल आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार यात 6.55-इंच FHD+ डिस्प्लेसह 1,080 X 2,400 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि पंच होल कटआउट सेल्फी कॅमेरा असेल. बोलले जात आहे कि फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 एसओसी दिली जाईल. फोनमध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज दिली जाईल. तसेच, फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी 65W फास्ट-चार्जिंगसह असेल.

वनप्लस 9 प्रो व्हिडीओ